covid 19 update and vaccine in ratnagiri district update for today 
कोकण

रत्नागिरीत लसीकरणासाठी पोर्टलसह प्रत्यक्षात केंद्रावर जाऊनही करता येणार नोंदणी

राजेश कळंबटे

रत्नागिरी : कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून 59 केंद्रांवर कोरोना लसीकरणाची मोहीम सुरु आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यातील 28 हजार 221 जणांना लस देण्यात आली असून दुसर्‍या टप्प्यातील 7 हजार 547 जणांना लस दिली आहे. जिल्ह्यात 16 जानेवारीपासून फ्रंटलाईन कोरोना योध्यांना लसीकरणात सहभागी करून घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात पंधरा हजारपेक्षा अधिक आरोग्य कर्मचार्‍यांची यादी शासनाला सादर केली होती.

या यंत्रणेतील अधिकारी, कर्मचार्‍यांनाही लस घेण्याचे आवाहन प्रशासनस्तरावरून करण्यात आले. आरोग्य यंत्रणेतील शासकीय, खासगी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय तसेच आरोग्य सेवक - सेविकांकडून प्रतिसाद कमी मिळाला. लसीकरणाच्या यादीत नाव असलेल्या 15,773 आरोग्य कर्मचार्‍यांपैकी 9 हजार 422 जणांनी लस घेतली. 

महसूल, पोलिसांपैकी 23 टक्के कर्मचारीच लसीकरणासाठी पुढे आले. महसूलमधील 1 हजार 20 जणांची तर पोलीसांमधील 1 हजार 717 जणांची यादी होती. सध्या प्रौढ, ज्येष्ठ नागरिकांसह कोमोर्बीड रुग्णांना लस दिली जात आहे. 1 मार्चपासून 45 ते 59 वयोगटातील लोकांसाठी लसीकरणात समावेश केला आहे. 60 वर्षे वरील ज्येष्ठांमध्ये एकूण साडेपाच हजार लोकांनी कोविड व्हॅक्सीनचा डोस घेतला आहे. लसीकरणासाठी सुमारे 83 हजार जणांनी नोंदणी केली होती.

पहिल्या दोन टप्प्यात पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी आवश्यक केली होती. सध्या पोर्टलसह प्रत्यक्षात केंद्रावर जाऊन नोंदणी करण्याची सुविधा दिली आहे. त्याला प्रतिसाद चांगला मिळत आहे. जिल्ह्यात 38 प्राथमिक आरोग्य केंद्र, 14 ग्रामीण रुग्णालय, उपकेंद्र व उपजिल्हा रुग्णालये तर 7 खासगी रुग्णालयात लसीकरण मोहीम सुरु आहे. लोकांना जवळच्या जवळ सेवा उपलब्ध व्हावी यासाठी आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे.

"जास्तीत जास्त लोकांना कोरोना लस देण्यासाठी नियोजन केले आहे. ज्यांना शक्य आहे, त्यांनी पोर्टलवर नोंदणी करावी अन्यथा प्रत्यक्षात जाऊन केंद्रावर नोंदणी करण्यात येणार आहे."

- डॉ. बबिता कमलापुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरलं! 'वैद्यकीय पदवी नसताना चालवला दवाखाना'; तीन बोगस डॉक्टरांवर गुन्हा, अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया

Pune News: शीव, पाणंद, रस्त्यांची गावदप्तरी नोंद होणार; जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे समितीची राज्य सरकारला शिफारस

'मी जेवणात उंदीर खाल्लाय' 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतील अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, 'हे ऐकून माझ्या....'

Ahilyanagar Crime:'सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवले'; अकोले तालुक्यात उडली खळबळ

Latest Marathi News Live Updates : रायगडमध्ये तूफान पाऊस, रेड अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT