कोकण

सिंधुदुर्गात लसीकरणाला सुरूवात

तुषार सावंत

कणकवली (सिंधुदुर्ग) : चक्रीवादळामुळे (Tauktar Cyclone) गेल्या शनिवारपासून बंद ठेवण्यात आलेले लसीकरण (Covid 19 Vaccine)जिल्ह्यात पुन्हा एकदा सुरू होत आहे. जिल्ह्यातील पूर्वनियोजित केंद्रावर 45 वर्षे वरील नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांना यादीप्रमाणे दुसरा डोस (Second Vaccine)आज पासून दिला जाणार आहे. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे जिल्ह्यात 2200 डोस प्राप्त झाले आहेत.

Covid 19 vaccination in Sindhudurg from today covid 19 update marathi news

कोकण किनारपट्टीवर शनिवारपासून चार दिवस चक्रीवादळ आणि मुसळधार पावसाने हाहाकार माजवला होता यामुळे संपर्काचे साधन पूर्णतः कोलमडून गेले होते. विविध लसीकरण केंद्रांवरील वीजपुरवठाही खंडित झाला होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी 18 मे पर्यंत लसीकरण मोहिमेला स्थगिती दिली होती.

आता जिल्ह्यातील बहुतांशी लसीकरण केंद्रावरील वीज पुरवठा सुरळीत झाला आहे. तसेच संपर्काची माध्यमं ही कार्यान्वित झाल्याने जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर आज पासून दुसरा डोस प्राधान्याने दिला जाणार आहे.ज्या नागरिकांनी यापूर्वी डोस घेतला आहे. अशा नागरिकांना यादीप्रमाणे लसीकरण केले जाणार आहे.

Covid 19 vaccination in Sindhudurg from today covid 19 update marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT