crime case in ratnagiri mother and son arrested by police after two months 
कोकण

सावकारी कायद्यानुसार आई आणि मुलावर अखेर गुन्हा दाखल; रत्नागिरीतील घटना

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : सावकारी कायद्यानुसार शहरातील आई-मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार उघड झाल्यापासून अडीच महिन्यांचा अवधी गुन्हा दाखल करण्यासाठी लागला. रोहन गजेंद्र शिर्के आणि त्याची आई लीना गजेंद्र शिर्के (दोन्ही रा. शिर्के मेन्शन, टीआरपी, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. 

अडीच महिन्यांपूर्वी टीआरपी येथे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या पथकाने टीआरपी येथील शिर्के मेन्शन येथे अवैध सावकारी व्यवसायप्रकरणी धाड टाकली होती. त्या धाडीनंतर दोन संशयितांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. रोहन गजेंद्र शिर्के आणि त्याची आई लिना गजेंद्र शिर्के (दोन्ही रा. शिर्के मेन्शन, टीआरपी, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. शुक्रवारी (12 ) सायंकाळी दोघांवर गुन्हा दाखल केला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नरेश विठोबा जाधव (रा. सोमेश्‍वर, रत्नागिरी) यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे अर्ज केला होता. त्या अर्जाची दखल घेत, जिल्हा उपनिबंधक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे त्यांच्या पथकाने शिर्के यांच्या घरी जाऊन सावकारी कर्जाचे सर्व दस्तावेज पथकास उपलब्ध करून देण्याची नोटीस दिली होती. परंतु शिर्के यांनी कोणतीही कागदपत्रे त्यांच्यासमोर हजर केली नव्हती. दरम्यान, तालुक्‍याबाहेरही सावकारी करत असल्याचे स्पष्ट झाल्यावर याबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे प्राधिकृत अधिकारी श्रीहरी देवू पळसकर (58) यांनी शहर पोलिस ठाण्यात रोहन शिर्के आणि लीना शिर्के यांच्याविरोधात तक्रार दिली. त्यानुसार या दोघांविरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

परवाना रत्नागिरी तालुक्‍यापुरताच 

दरम्यान, 12 जणांच्या पथकाने त्यांच्या घराची झडती घेतली. त्यामध्ये बॉण्ड पेपर, चेक, हमीपत्र, करारपत्र अशी आक्षेपार्ह कागदपत्रे मिळून आली होती. तसेच लीना शिर्के हिच्याकडे सावकारी व्यवसाय करण्याचा परवाना रत्नागिरी तालुक्‍यापुरताच मर्यादित असतानाही राजापूर येथील रामनाथ वाकडे यांच्यासोबत केलेले करारपत्र मिळून आल्याने ती रत्नागिरी तालुक्‍याबाहेरही सावकारी व्यवसाय चालवत असल्याचे निदर्शनास आले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khambatki Ghat : सलग सुट्ट्यांमुळे सातारा–पुणे महामार्गावरील खंबाटकी घाट जाम होणार? एकाच लेनमधून सुरू आहे वाहतूक, 'या' वळणावर अपघाताचाही धोका!

Lucky Rashifal 2026: मीन राशीतील शनीचा प्रभाव! ‘या’ राशींच्या इनकममध्ये होणार मोठी वाढ

Kalyan-Dombivli Municipal Election : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या जागा वाटपावरून युतीत अनिश्चिततेचे ढग; 73 जागांच्या मागणीने युतीत तणाव !

Panchang 26 December 2025: आजच्या दिवशी

वाहतूक समस्येला ‘लोकवैज्ञानिक’ पर्याय

SCROLL FOR NEXT