कोकण

CCTV फुटेज आधारे संशयिताचा माग; चिपळूणात तपासाला वेग

सकाळ डिजिटल टीम

चिपळूण : शहरातील गजबजलेल्या परिसरात परिचारिकेवर लैंगिक अत्याचार करून फरार झालेला संशयित ३६ तासानंतर देखील पोलिसांच्या हाती लागलेला नाही. घटनेची वेळ त्यापूर्वी व त्यानंतर असे सर्व सीसीटीव्ही फुटेज (cctv futege) पोलिसांनी तपासल्यानंतर संशयिताची हालचाल स्पष्ट होत असल्याने त्या दृष्टिकोनातून तपासाला वेग देण्यात आला आहे.

पीडितेने केलेले संशयिताचे वर्णन तसेच सीसीटीव्ही फुटेजमधील संशयिताची हालचाल, याची सांगड घालण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी वेगाने तपास मोहीम राबवली असून (chiplun police) प्रकरणातील काही महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पीडित तरुणीच्या तब्येतीतदेखील सुधारणा होत असून तिला घरी सोडण्यात आले आहे; मात्र तिला प्रचंड मानसिक धक्का बसल्याची माहिती नातेवाइकांकडून मिळत आहे. चिपळूण शहरातील (chiplun crimecase) मध्यवर्ती एसटी बसस्थानक भोगाळे हा परिसर गजबजलेला असतो.

सध्या बहुतेक एसटी फेऱ्या बंद आहेत. बाजारपेठदेखील संध्याकाळी बंद होते. त्यामुळे या परिसरात काहीशी शांतता असते. तरीही येथील रस्त्यावरून वाहतूक सुरूच असते. स्ट्रीटलाईट देखील चालू असतात. अशा स्थितीत तरुणाने परिचारिकेला गाठून अमानुषपणे तिला खेचत, घेऊन जात रस्त्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर तिच्यावर पाशवी अत्याचार केले. यामुळे चिपळूण हादरले आहे. तपास योग्य मार्गाने पुढे जात असल्याची माहिती उपलब्ध होत आहे. नराधम तरुण लवकरच पोलिसांच्या ताब्यात असेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शोधावर पोलिसांचे पथक, ठसेतज्ञ, श्वानपथकाला पाचारण

एसटी स्थानक परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जमा करून निरीक्षणदेखील केले. पसार झालेल्या नराधमाच्या शोधावर पोलिसांचे पथकदेखील पाठवण्यात आले. ठसेतज्ञ तसेच श्वानपथकाला पाचारण करून तपासाची दिशादेखील ठरवण्यात आली. तपासाचा भाग म्हणून पोलिस आता या प्रकरणात अधिक माहिती देण्यास नकार देत आहेत; मात्र पोलिसांना या प्रकरणात महत्वाचे धागेदोरे हाती लागले असल्याची माहिती मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT