crime cases in kokan one married couple scuffle in ratnagiri 
कोकण

जमिनीच्या वादातून पंधराजणांनी केली दाम्पत्याला बेदम मारहाण ; कोकणातील प्रकार

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जमिनीच्या वादाची मोठी किंमत खासगी कृषी सल्लागार म्हणून शेतात काम करणाऱ्या दाम्पत्याला मोजावी लागली. जमीन वादातून पंधराजणांच्या जमावाने काम करणाऱ्या दाम्पत्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला.

तालुक्‍यातील हरचिरी-तळेकरवाडी येथे शुक्रवारी (ता. १२) सकाळी साडेदहाच्या सुमारास घटना घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात १५ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात देवजी रत्नाकर रोकडे, मनोहर महादेव तळेकर, अनिल सदाशिव तळेकर, सुनीता रोकडे, श्वेता तळेकर, रंजना तळेकर, सलोनी तळेकर, सुरेखा तळेकर, अस्मिता तळेकर, अंकेश तळेकर, शाम तळेकर, दत्ताराम तळेकर, विनोद तळेकर, नंदकुमार तळेकर, अशोक तळेकर (सर्व रा. तळेकरवाडी हरचिरी, रत्नागिरी) या संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. हरचेरी-तळेकरवाडी येथे सर्वे नं. ८५ हिस्सा नं. १ येथे घटना घडली. 

प्रणीत पर्शुराम तारी (वय ४०, रा. लिंगायतवाडी, रत्नागिरी) हे व दीपाली मंगेश पांचाळ-तारी हे दाम्पत्य खासगी कृषी सल्लागार आहेत. ते धनंजय किरकिरे यांच्या तळेकरवाडीत शेतामध्ये काम करत होते; मात्र संशयित आणि किरकिरे यांच्यात जमिनीचा वाद होता. त्याचा राग संशयितांनी काम करणाऱ्या सल्लागार कुटुंबांवर काढला. पंधराजणांचा जमाव तेथे गेला. त्यांनी शेतातील काम बंद पाडले. सगळे कामगार येथून निघून जा, असा इशारा देत शिवीगाळ केली आणि दाम्पत्याला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून धमकी दिली. या प्रकरणी प्रणीत तारी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी पंधरा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास स. पो. नि. आबा पाटील करीत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

SCROLL FOR NEXT