crime cases in ratnagiri employees arrested by police for crime 
कोकण

मोबाईल शॉपीत चोरी, पावणेपाच लाखांच्या ऐवजावर डल्ला ; कामगारच निघाले चोर

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : बांधकामाचे काम करणाऱ्या पश्‍चिम बंगालच्या कामगारांनीच शहराबाहेरील कुवारबाव येथील नव्या मोबाईल शॉपीची रेकी करून ती फोडल्याचे उघड झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसी खाक्‍या दाखविल्यावर काल रात्री उशिरा चोरी उघडकीस आली. चोरट्यांकडून चार लाख ८७ हजार रुपयांचे मोबाईल, ब्ल्यू टूथ, रोख रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी दोन कामगारांना अटक केली असून, आणखी काही साथीदारांचा शोध सुरू आहे. हारुन मुबाकर हुसेन रशीद (वय २२), साहिल मोहसीन आलम शेख (२२, रा. पश्‍चिम बंगाल) अशी अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत.

कुवारबाव एसटी थांब्यासमोर स्नेहल साळवी यांनी पंधरा दिवसांपूर्वी ‘मॅंगोज मोबाईल’ शॉपी सुरू केली होती. २६ फेब्रुवारीला सकाळी त्यांना मोबाईल शॉपी फोडल्याचे निदर्शनास आले. शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा समांतर तपास करीत होते. शॉपीच्या भिंतीला ज्या प्रकारे कोरून भगदाड पाडण्यात आले होते. त्यावरून चोरटे बांधकाम क्षेत्रातील अनुभवी कामगार असल्याचा पोलिसांचा अंदाज होता. शहर पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेने परिसरात बांधकामावरील कामगारांची माहिती घेऊन चौकशी सुरू केली. दरम्यान, संशयितांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पोलिस टीमची कामगिरी

पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा, पोलिस कर्मचारी सुभाष भागणे, मिलिंद कदम, शांताराम झोरे, रमीज शेख, सागर साळवी, उत्तम सासवे, अमोल भोसले, नितीन डोमणे, बाळू पालकर यांनी ही कामगिरी केली. 

प्लॅन तडीस नेला, तो प्रयत्न फसला

मोबाईल शॉपी फोडण्याचा त्यांनी प्लॅन तयार केला आणि तडीस नेला. मात्र, मोबाईल विकण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. चोरलेले मोबाईल सिमेंटच्या पोत्यात भरून ठेवले होते. लपवून ठेवलेले सुमारे चार लाख ७४ हजार १४९ किमतीचे सुमारे ३८ मोबाईल, ब्ल्यू टूथ जप्त केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पंचनामा करून मुद्देमाल जप्त केला.

पोलिस चौकीच्या बाजूलाच ते कामगार

पोलिस चौकीच्या बाजूला एका इमारतीचे प्लास्टर करण्यासाठी पश्‍चिम बंगालमधील कामगार असल्याची माहिती मिळाली. तेथील दहा ते पंधरा कामगारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यापैकी हारून मुबाकर हुसेन रशीद, साहिल मोहसीन आलम या दोघांनीही समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. पोलिसांनी दोघांची स्वतंत्र चौकशी केली. त्यात विसंगती आढळल्याने पोलिसांचा त्यांच्यावरील संशय बळावला. पोलिसी इंगा दाखविल्यांतर दोघांनी आपण चोरी केल्याची कबुली दिली.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray on Bacchu Kadu : उद्धव ठाकरेंचा बच्चू कडूंवर 'प्रहार', "मंत्री केलं, ही माझी चूक", कार्यकर्त्यांनी सोडली पक्षाची साथ

Crohn’s Disease असलेल्या गर्भवती महिलांना Premature Delivery चा धोका जास्त असतो? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Latest Marathi News Live Update : पिंपरी चिंचवड शहरात जोरदार अवकाळी पावसामुळे वीज पुरवठा करणाऱ्या डीपीमध्ये मोठा ब्लास्ट

'MS Dhoni ला कोणीही मिस करत नाही, CSK ने लोकांना मूर्ख बनवणे थांबवावे'; वर्ल्ड कप विजेत्या भारतीय खेळाडूकडून IPL फ्रँचायझीची पोलखोल

Outsourced Hiring: आउटसोर्स भरती म्हणजे युवकांचे शोषण; हायकोर्टाचा मोठा निर्णय, सरकारी भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT