crime registered against four people who illegally come mumbai to ratnagiri 
कोकण

पोलिसांना चुकवून मुंबईतून गावात आले पण....

सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी - कोणताही परवाना न घेता मुंबईहून दुचाकीने कोकिसरे येथे आलेल्या चौघांवर पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. या चौघांमध्ये एका महिलेचा समावेश असून चौघांनाही संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. 

अनिकेत अनंत गुरव (वय-२५,) नरेंद्र सुर्यकांत गुरव (२४, दोन्ही रा.मालाड), राकेश रघुनाथ गुरव (३०), प्रिया राकेश गुरव (२६ रा.नायगाव मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 
 
कोकिसरे येथील हे चौघे आपल्या मालकीच्या दुचाकीवरून (क्रमांक-एमएच ०७,अेएल-९८९४, क्रमांक-एमएच०२इएन-०१५०) ११ मे रोजी मुंबई-गोवा महामार्गाने खारेपाटण येथे आले. कोणताही परवाना नसल्यामुळे खारेपाटण तपासणी नाक्यावरील पोलिसांनी त्यांना परत मुंबईत जाण्यास सांगीतले. परंतु त्यांनी आडमार्गाचा वापर करीत आपले मुळ गाव गाठले. ही माहीती गावातील आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांना समजल्यानतंर त्यांनी तत्काळ वरिष्ठांना माहीती दिली. प्रशासनाने या चौघांना सांगुळवाडी येथे संस्थात्मक क्वारंटाईन केले.

कोणताही अधिकृत परवाना न घेता तालुक्यात प्रवेश केल्याबद्दलची माहीती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी मंगळवारी सांयकांळी या चौघांविरूध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे.


मुंबईत कोकणातील लाखो लोक राहतात. सध्या मुंबईत कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे भितीने कोकणातील लोक मिळेल ते वाहन किवा प्रसंगी पायी प्रवास करीत गावाकडे येत आहेत. गेल्या काही दिवसांत तर कित्येक चाकरमानी दाखल झाले आहेत. बुधवारी एका दिवसांत ८३ व्यक्ती तालुक्यात दाखल झाल्या. त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.


यापुढेसुध्दा असेच गुन्हे दाखल होणार

आडमार्गाने विनापरवाना तालुक्यात आलेल्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवाना येणाऱ्या लोकांवर यापुढे देखील गुन्हे दाखल केले जातील. त्यामुळे कुणीही विनापरवाना येऊ नये असे आवाहन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संविधानात बसेल ते मिळेल, कुणाच्या ताटातलं देणार नाही; मराठा आरक्षणावर फडणवीसांची प्रतिक्रिया, जरांगे म्हणाले, ताटच उरणार नाही

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Pithori Amavasya 2026: १० की ११ सप्टेंबर? पिठोरी अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, पूजेची पद्धत अन् महत्त्व!

Sainik Takli MIDC protest : सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधात शिरोळमध्ये राडा; प्रशासनाच्या कार्यालयाचे गेट तोडले, काचा फोडल्या, पोलिस कर्मचारी जखमी

SCROLL FOR NEXT