criminel hitting by women in sindudurg kokan marathim news 
कोकण

ती गेली जाब विचारायला आणि तिलाच...

सकाळ वृत्तसेवा

मालवण (सिंधुदूर्ग ) : शहरातील तानाजी नाका येथे मध्यरात्री धिंगाणा घालणाऱ्या युवकांनावविचारल्याच्या रागातून युवकांच्या टोळक्‍याने एका महिलेस व तिच्या दिरास मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संबंधित महिलेच्या कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी संशयित युवकांविरोधात संबंधित महिलेने तक्रार दिली आहे.

याबाबतची माहिती अशी, वायरी तानाजी नाका परिसरात मध्यरात्री काही युवकांचे टोळके वाढदिवस साजरा करत होते. त्यांच्याकडून धिंगाणा सुरू असल्याने तेथील एका महिलेने घराबाहेर येत धिंगाणा का घालत आहात असे विचारले. याचा राग आल्याने तेथे आलेल्या त्या महिलेच्या दिरास युवकांच्या टोळक्‍याने मारहाण करण्यास सुरुवात केली.

कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण

त्याला सोडविण्यास गेलेल्या महिलेलाही त्यांनी मारहाण केली. मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे त्या महिलेच्या कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण होते. या प्रकरणी त्या संशयित युवकांच्या विरोधात महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. संशयितांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT