crop insurance policy open by farmers but protection of insurance rate decreased in ratnagiri 
कोकण

कोकणात शेतकरी उदासीन ; यंदा विमा संरक्षित क्षेत्रामध्ये घट

सकाळ वृत्तसेवा

राजापूर : तालुक्‍यात पीक विमा उतरविण्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी शेतकऱ्यांची संख्या वाढली असली तरी, विमा संरक्षित क्षेत्रामध्ये घट झाली आहे. या वर्षी तालुक्‍यातील खरिपाच्या ११,७६४ हेक्‍टर क्षेत्रापैकी केवळ १५.०२ हेक्‍टर क्षेत्रावरील विमा उतरविला आहे.     

गतवर्षी अवकाळी पाऊस, क्‍यार वादळ आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव या नैसर्गिक आपत्तींचा फटका बसून शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी प्रधानमंत्री पीकविमा योजनेतर्गंत विमा संरक्षण उतरविण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा अंदाज होता. मात्र, तो फोल ठरला आहे. या योजनेत काही ठराविक रक्कम भरून भातासह नागली पिकांचे विमा उतरविले जातात. या योजनेमध्ये जोखीमस्तर सर्व पिकांसाठी सत्तर टक्के ठेवला आहे.

प्रतिकूल हवामान घटकामुळे पेरणी, लावणी, उगवण न होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणीपश्‍चात नुकसान आदी निकषांन्वये नुकसानीची छाननी करून विमा उतरविलेल्या शेतकऱ्याला भरपाई दिली जाते. गतवर्षी अवकाळी पाऊस, किडींमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.
 

पिकाचा विमा उतरविला असता तर शेतकऱ्यांना भरपाई मिळाली असती. मात्र, शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याला उदासीनता दाखविली होती. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी विमा संरक्षित क्षेत्रामध्ये घट झाली आहे. गतवर्षी ३५ शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. त्यातून १९.८१ हेक्‍टर क्षेत्र संरक्षित झाले होते. या वर्षी ५३ जणांनी विमा उतरविला असून त्याच्यातून १५.०२ हेक्‍टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. 

पीक विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांची गावे 

भालावली, गोवळ, मूर, ताम्हाणे, पाचल, परुळे, मोसम, मोरोशी, कोंडोशी, केळवली, कशेळी, वाडापेठ, कोंडसर बुद्रुक, कोंडसर खुर्द.  विमा संरक्षित क्षेत्र ः १५.०२ हेक्‍टर, शेतकरी ः ५३

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT