Cyclone Biparjoy esakal
कोकण

Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात चक्रीवादळ; 12 जूनपर्यंत समुद्र खवळलेलाच राहणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. जे मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात गेले असतील, त्यांनी किनारी परतावे.

सकाळ डिजिटल टीम

वेगाने वारे वाहणार असल्याने नागरिक, पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

रत्नागिरी : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई (Meteorological Department, Mumbai) यांच्याकडून मिळालेल्या पूर्वसूचनेनुसार अरबी समुद्रात (Arabian Sea) बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone Biparjoy) तयार झाले असून, त्या वादळामुळे ९ ते १२ जून या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे.

मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. जे मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात गेले असतील, त्यांनी किनारी परतावे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून, वेगाने वारे वाहणार असल्याने नागरिक, पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

प्रादेशिक हवामान विभागाकडून दिलेल्या सूचनेनुसार, जिल्ह्यात वेगवान वारे वाहत आहेत. गेले दोन दिवस जिल्ह्यात किनारी भागात वेगवान वारे वाहत आहेत. ता. ८ रोजी भरती आणि वादळाचा परिणाम किनारी भागात जाणवला. गणपतीपुळेत मोठ्या लाटा किनारी भागातील स्टॉलमध्ये शिरल्या होत्या. त्यामुळे मोठे नुकसान झाले नसले, तरीही पर्यटकांसाठी धोकादायक ठरणाऱ्या आहेत.

आजही किनारी भागात वेगवान वारे वाहत होते. वादळाचा प्रभाव पुढील तीन दिवस राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यानुसार आज (ता. १०) जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा वेग ३०-४० किमी प्रतितास राहील, तसेच गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. रविवारी (ता. ११) जिल्ह्यातील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचे पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि गोवा-महाराष्ट्र किनाऱ्याजवळ आणि बाहेर ३५-४५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील.

सोमवारी (ता. १२) जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र किनाऱ्याजवळ समुद्र खवळलेला राहील आणि समुद्राजवळून ४०-५० किलोमीटर, तर कमाल ५५ ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर, कर्नाटक-गोवा महाराष्ट्र किनाऱ्याजवळ समुद्र खवळलेला राहील. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असल्याने नागरिकांनी पोहण्यासाठी समुद्रात उतरू नये, समुद्राच्या ठिकाणी सेल्फी काढू नयेत.

आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा

  • जिल्हा नियंत्रण कक्ष- ०२३५२२२६२४८ २२२२३३

  • जिल्हा पोलिस नियंत्रण कक्ष- ०२३५२-२२२२२२

  • प्रादेशिक बंदर विभाग नियंत्रण कक्ष- ०२३५२२९५७५६ तर

  • राजापूर- ०२३५२-२२२०२७

  • लांजा- ०२३५१२९५०२४

  • रत्नागिरी- ०२३५२-२२३१२७

  • संगमेश्वर- ०२३५४-२६००२४

  • चिपळूण- ०२३५५-२९५००४

  • गुहागर- ०२३५९-२४०२३७

  • खेड- ०२३५६-२६३०३१

  • दापोली- ०२३५८-२८२०३६

  • मंडणगड- ०२३५०-२२५२३६

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क करावा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नयेत. कोणत्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्यावी.

- एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT