the cyclothon organised gold medal won by vikrant alekar in ratnagiri 
कोकण

विक्रांत आलेकर यांना सुवर्णपदक; 3 तासांत कापले 72 किमी अंतर

मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याअंतर्गत लांब पल्याची नजीकच्या काळात आयोजित केलेली पहिलीच सायक्लोथॉन पार पडली. यामध्ये चिपळूण, खेड, रत्नागिरी, दापोली, गुहागर आणि देवगड तालुक्यातील सुमारे 40 सायकलपट्टूनी यात सहभाग नोंदवला होता. चिपळूण येथील विक्रांत आलेकर यांनी हे अंतर 3 तास 4 मिनिटांत पार करून सुवर्णपदकाला गवसणी घातली. 

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर 'सायकलिंग करा, तंदुरुस्त राहा, प्रतिकारशक्ती वाढवा आणि रोगमुक्त व्हा' हा संदेश देत जिल्ह्यातील पहिली सायक्लोथॉन सुवर्णसूर्य फाउंडेशनने आयोजित केली. हेदवी ते गणपतीपुळे (व्हाया राई भातगाव पूल) ही 72 किलोमीटरच्या या सायक्लोथॉनला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला.

गुहागर येथील हेदवी गणपती मंदिराचे अध्यक्ष डॉ. जोगळेकर, सेक्रेटरी प्रसाद ओक, सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी आणि संचालिका तेजा देवस्थळी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून या सायक्लोथॉनला हिरवा झेंडा दाखवला. मार्गावरील 27 गावांमध्ये या उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती झाली. चिपळूण सायकल क्लबच्याच आकाश लकेश्री यांनी 3 तास 5 मिनीटे व प्रसाद आलेकर यांनी 3 तास 6 मिनिटात पार करून अनुक्रमे रौप्य आणि कास्य पदक मिळवले. त्यांना अनुक्रमे 5001, 3001 आणि 2001 रुपये बक्षीस देण्यात आले.

दापोलीच्या मोहिनी पाटील आणि मिलिंद खानविलकर, गुहागरच्या अनंत तानकर यांना रुपये 1001 व पदक हे उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कोरोनविषयक सर्व निर्बंध पाळून व सर्व शासकीय परवानग्या घेऊन केल्या गेलेल्या या सायक्लोथॉनच्या आयोजनावर सर्व स्पर्धकांनी समाधान व्यक्त केले. गणपतीपुळ्याच्या महालक्ष्मी हॉल येथे सायक्लोथॉनचे बक्षीस वितरण झाले. या कार्यक्रमासाठी एलआयसी रत्नागिरी आणि डीलाईट इंडस्ट्रीजचे सहकार्य लाभले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT