day to day robbery in sindhudurg district Kokan marathi News 
कोकण

त्याला आला मित्राचा फोन म्हणून गेला बाजारपेठेत आणि....

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदूर्ग) : येथील बाजारपेठेत माणगावातील तरुणाला भरदिवसा लुटल्याचा प्रकार आज घडला. दोघा संशयितांनी हातचलाखी करत त्या तरुणाचे ५० हजार रुपये पळवले. नीलेश बाळकृष्ण पालव (वय २५) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी त्याने दिलेल्या तक्रारीनुसार दोघा भामट्यांविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भर दिवसा हा प्रकार घडला आहे.

 जिल्ह्यात सध्या चोरट्यांचा धुडगूस सुरू आहे. कणकवली, सावंतवाडीत धाडसी चोऱ्या झाल्या. यानंतर पोलिसांनी एका चोरट्याला पकडले; मात्र चोरीसत्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. दोनच दिवसांपूर्वी कुडाळमध्ये चोरी झाली होती. आज पुन्हा सावंतवाडीत भरदिवसा चोरीचा प्रकार घडला. माणगाव येथील युवक नीलेश सावंतवाडी येथील स्टेट बॅंकेमध्ये पैसे भरण्यासाठी आला होता. त्याच्या मित्राचा फोन आला म्हणून तो बाजारपेठेत आला. त्याच्यापाठोपाठ आलेल्या दोन युवकांनी त्याला स्टॅंडवर जाण्याचा मार्ग विचारला व ते पुढे निघून 


सावंतवाडीत भरदिवसा चोरीचा प्रकार
गेले. याच दरम्यान हातचलाखी करत त्या दोघांनी पैसे पळवल्याचा संशय आहे. नीलेश बॅंकेमध्ये परत जात असताना आपल्या खिशातील पन्नास हजार नसल्याचे लक्षात आले. मार्ग विचारणाऱ्या त्या दोन चोरट्यांनी पैसे लंपास केल्याचा संशय यावेळी व्यक्त करण्यात आला. याबाबत नीलेश याने सावंतवाडी पोलिस ठाण्यात त्या दोन युवकांविरोधात चोरीची तक्रार दिली आहे. हवालदार संजय कदम तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT