Dead chickens found in the river in nandgaon kokan marathi news 
कोकण

चक्क नदीत मेलेल्या कोंबड्या दिसल्या अन् गावात उडाली खळबळ...

सकाळ वृत्तसेवा

नांदगाव (सिंधुदुर्ग) : मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव, असलदे, तावडेवाडी पियाळी नदी येथे वाहत्या पाण्यात अज्ञाताने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भली मोठी पोती भरून मृत ब्रॉयलर कोंबड्या टाकल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र, या कोंबड्या मृत झाल्यानंतर टाकल्या की जिवंत पोत्यात भरून टाकल्या, याबाबत माहिती समजू शकली नाही. मृत कोंबड्यांची पोती असलदे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाहेर काढून विल्हेवाट लावण्यात आली. 

या नदीशेजारीच नांदगाव व असलदे ग्रामपंचायतीच्या नळ-पाणी योजनेच्या विहिरी असल्याने पाणी दूषित होऊ नये यासाठी दोन्ही ग्रामपंचायतींनी सी. एल. पावडर टाकून पाणी शुद्धीकरण केले. घटनेची माहिती मिळताच असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच आफोजा नावलेकर, नांदगाव ग्रामविस्तार अधिकारी हरमळकर, असलदे ग्रामसेवक आर. डी. सावंत, ग्रा. पं. सदस्य मस्जिद बटवाले, अरुण बापार्डेकर, भाई मोरजकर, नांदगाव शाखाप्रमुख राजा म्हसकर, श्रीकांत नार्वेकर, असलदे ग्रा. पं. कर्मचारी प्रकाश वाळके, सत्यवान घाडी, मधुसूदन परब, सरपंच पंढरी वायंगणकर आदींनी पोलिसांना खबर दिली.

नांदगाव, असलदेतील प्रकार

यावेळी कणकवली येथून पोलिस राजकुमार खाडे व कासार्डे पोलिस दूरक्षेत्राचे रमेश नारनवर यांनी घटनास्थळाची माहिती घेतली. रविवारीच या कोंबड्या टाकल्याची शक्‍यता आहे. असलदे ग्रामपंचायत सदस्य दिनेश तावडे यांचे शेजारीच घर असल्याने त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी तत्काळ असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांना माहिती दिली. घटनास्थळाशेजारीच नळ-पाणी योजनेच्या विहिरी असल्याने परिसरात खळबळ उडाली. 

हेही वाचा- Sakal Impact : इचलकरंजीत डॉक्टर अखेर नरमले....
 
कठोर कारवाईची मागणी 
"कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर सध्या ब्रॉयलर कोंबड्या विक्रीत कमालीची घट झाली आहे. कोंबड्या होलसेल विक्री करणाऱ्या अज्ञातांचेच हे कृत्य असल्याचे असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी सांगितले. या कोंबड्या मृत झाल्यानंतर टाकल्या की जिवंत टाकल्या, याची माहिती मिळालेली नाही. अज्ञाताचा पोलिसांनी कसून शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT