The death of an elderly man brought to Dapoli for treatment has created a sensation in the taluka 
कोकण

त्या मृत वृद्धाच्या हातावर होता होम क्वॉरंटाईनचा शिक्का ; उडाली खळबळ... ...

सकाळवृत्तसेवा

दापोली - दापोली तालुक्यातील बुरोंडी तेलेश्वर नगर येथे मुंबई येथून आलेल्या एका वृद्धाचा काल रात्री दापोली येथे उपचारासाठी आणताना मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
ही व्यक्ती 22 मार्च रोजी घाटकोपर (मुंबई) येथून बुरोंडी येथे आपल्या घरी आली होती. मुंबई येथून आल्याने आरोग्य विभागाने त्यांना होम क्वाॅरंटाईनचा सल्ला दिला होता. मुंबई येथून ते एकटेच आले होते, त्यांची पत्नी व दोन मुले घाटकोपर येथेच होती, काल रात्री 11 वाजणेचे सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना दापोली  येथील एका खाजगी रुग्णालयात आणण्यात आले तेथे तपासून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले.  उपजिल्हा रुग्णालयात नेल्यावर तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.

या व्यक्तीच्या हातावर होम क्वाॅरंटाईनचा शिक्का असल्याने लगेचच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. या व्यक्तीच्या मृत्यूमुळे काल रात्रभर शासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. मृत व्यक्तीच्या स्वँब चा नमुना घेण्यात आला असून तो तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आला आहे.

दरम्यान या व्यक्तीला घेऊन आलेल्या 10 गावकऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून कृषी विद्यापीठाच्या शेतकरी निवास येथील क्वाॅरंटाईन कक्षात दाखल करण्यात आले आहे.

मृत्यूचे कारण अस्पष्ट

दापोलीच्या उपजिल्हा रुग्णलयात दाखल करण्यापूर्वीच या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृत्यू कशाने झाला ? हे नेमके कळू शकलेले नाही, मिरज येथून अहवाल आल्यावरच मृत्यू कशामुळे झाला हे समजू शकेल.

डॉ. डी. डी. जाधव
वैद्यकीय अधीक्षक - उपजिल्हा रुग्णालय, दापोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Rahul Gandhi: दुसरी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी काय सिद्ध केलं? निवडणूक आयोगाला दिलेला अल्टिमेटम नेमका काय आहे?

Pune Encroachment : शहरातील हजारो चौरस फुटावरील अतिक्रमण हटवले

Teachers Award : १०९ शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर; पुणे जिल्ह्यातील सहा शिक्षकांचा समावेश

Ayush Komkar Case : आयुषच्या खूनापुर्वी आरोपींची एकत्रित बैठक; वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

SCROLL FOR NEXT