Debate On Congress Distirct President Appointment Ratnagiri Marathi News  
कोकण

कॉंग्रेसमध्ये 'येथे' पुन्हा एकदा नियुक्ती वाद 

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - कॉंग्रेसमध्ये पुन्हा एकदा नियुक्ती वाद उफाळून आला आहे. शहराध्यक्ष नियुक्ती वाद तात्पुरता थांबल्यानंतर आता रत्नागिरी तालुका युवक कॉंग्रेसपदाची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कालच एका गटाने भाग्येश मयेकर यांची रत्नागिरी तालुका युवक कॉंग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची घोषणा केली होती; मात्र आपण अशी कोणतीही नियुक्ती केलेली नाही, असा खुलासा जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी आज केला आहे. त्यामुळे कॉंग्रेसमधील दोन्ही गट पुन्हा आमने-सामने ठाकले आहेत. 

रत्नागिरी तालुका युवक कॉंग्रेस अध्यक्षपदी मयेकर यांची निवड झाल्याचे कॉंग्रेसच्या एका गटाने काल कळविले होते. या वेळी रत्नागिरी जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष अविनाश मोहिते, माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर, सरचिटणीस सुरेश कातकर, तालुकाध्यक्ष प्रसाद उपळेकर, चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, माजी गटाध्यक्ष रतन पवार, अशोक साळवी आदींनी याची घोषणा केल्याचे म्हटले होते. मात्र मयेकर यांची ही नियुक्ती औट घटकेची ठरली की काय असा संशय निर्माण होणारा खुलासा दस्तुरखुद्द युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांनी केला आहे. 

जिल्ह्यातील युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकांची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेबाबत काही इच्छुकांची नावे जिल्हा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे आली आहेत; परंतु आजतागायत जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्‍यामध्ये नव्याने नेमणुका केलेल्या नाहीत वा तशा प्रकारची शिफारसपत्र देण्यात आलेली नाहीत. काही वृत्तपत्रात नेमणुकांबाबतचे वृत्त छापून आलेले आहे ते वृत्त चुकीचे आहे. त्यांच्याशी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सहमत नाहीत, असा खुलासा युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश मोहिते यांनी केला आहे. 

गटातटाचे राजकारण 

कॉंग्रेसमधील कीर आणि भोसले गटाचा वाद संपता संपेना. यापूर्वी रत्नागिरी शहराध्यक्ष राकेश चव्हाण यांची नियुक्ती रद्द केल्याचा विषय, कॉंग्रेस भुवनला लावलेले टाळे आदी विषय मागे पडत असताना आता युवक तालुकाध्यक्ष नियुक्तीपदावरून नवीन वाद उफाळून आला आहे. त्यामुळे कॉंग्रेस गटातटाच्या राजकारणाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT