Decision to install Amboli CCTV
Decision to install Amboli CCTV 
कोकण

आंबोली आता सीसीटीव्हीच्या नजरेत 

अनिल चव्हाण

सिंधुदुर्गनगरी - आंबोली या पर्यटनस्थळी दरीमध्ये मृतदेह टाकण्याचे प्रकार आणि अवैध धंदे वाढले आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा नियोजनमधून 52 लाख रुपये निधी खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टुरिझमसाठी पोलिसांना तीन गाड्या देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

पालकमंत्री सामंत हे जिल्हा दौऱ्यावर असून, त्यांनी आज कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, अतुल रावराणे आदी उपस्थित होते. 

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री सामंत म्हणाले, ""सिंधुदुर्गातील आंबोली हे महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. याठिकाणी मोठ्या दऱ्या आहेत. त्यामुळे येथील खोल असलेल्या दऱ्या आणि झुडपे याचा अवैध धंद्यासाठी उपयोग होताना दिसत आहे. या ठिकाणी दरीमध्ये आतापर्यंत अनेक मृतदेह टाकण्यात आल्याचेही प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे अशा अवैध धंद्यांना रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा नियोजनमधून 52 लाख रुपये निधी खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथील अवैध धंदे रोखण्याच्या दृष्टीने टूरिझमसाठी पोलिसांना तीन गाड्या देण्यात येणार आहेत.'' 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी कुडाळ येथील खासगी रुग्णालयात आपल्या अधिकारात तपासणी केली; परंतु त्यांचा यामागील हेतू शुद्ध नव्हता. त्यामुळे त्यांची बदली करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामध्ये माझा कोणताही रोल नव्हता.

पूर्वीचा राग मनात ठेवून खासगी डॉक्‍टरांना छळत असल्याच्या तक्रारी खासगी डॉक्‍टरांनी केल्या होत्या. जिल्हा शल्यचिकित्सकपदी नियुक्ती झाल्यावर खासगी डॉक्‍टरांची तपासणी करण्यात जेवढी डॉ. चव्हाण यांनी तत्परता दाखवली तेवढी तत्परता त्यांनी कोविड महामारीच्या काळात दाखवलेली नाही. त्यांच्या बदलीला आता स्थगिती मिळाली आहे. तेव्हा ते पुन्हा जिल्हा शल्यचिकित्सकपदी आहेत. त्यांनी जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टीने काम करावे, अशा सूचना त्यांना दिल्या. सावंतवाडी तालुक्‍यातील निगुडे भागात उत्खननासाठी स्फोट घडवून आणले जातात. त्यामुळे येथील घरांना तडे गेले असल्याची तक्रारी आल्या आहेत. याबाबत गंभीर दखल घेऊन चौकशी केली जाईल, असे आश्‍वासन श्री. सामंत यांनी दिले. 

महाविकास आघाडी सज्ज 
आगामी ग्रामपंचायत निवडणुका व यापुढील सर्व निवडणुका शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस अशा महाआघाडीतर्फे लढविण्यात येतील. याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती श्री. सामंत यांनी दिली. 

संपादन - राहुल पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : 'म्हाडा'च्या इमारतीचं छत कोसळलं; विक्रोळीत दोन वृद्धांचा मृत्यू

LinkedIn Jobs Alerts : फ्रेशर आहात आणि चांगली नोकरी हवीय तर हे करायलाच हवं; LinkedIn नेच दिलाय लाखमोलाचा सल्ला

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

SCROLL FOR NEXT