'डीपकाडी जनाई-श्रीरंगी' या फुलवनस्पतीचा शोध  sakal
कोकण

'डीपकाडी जनाई-श्रीरंगी' या फुलवनस्पतीचा शोध

गुहागरातील नरवण परिसरात नवी प्रजाती; कोकणात फक्त जांभ्या पठारावर आढळ

राजेंद्र बाईत

राजापूर : कोकणातील कातळ परिसरामध्ये फुलणाऱ्या विविधांगी जागतिकस्तरीय फुलवनस्पतींमध्ये आता एका नव्या वनस्पतीची भर पडली आहे. गुहागर तालुक्यातील नरवण परिसरामध्ये 'डिपकाडी जनाई-श्रीरंगी' या नव्या प्रजातीच्या जागतिकस्तरीय फुलवनस्पतीचा शोध लागला आहे. ही फुलवनस्पती प्रदेशनिष्ठ असून कोकणातील जांभ्या पठाराव्यतिरिक्त अन्य कुठेही आढळत नाही. नवसंशोधित 'डिपकाडी जनाई-श्रीरंगी' या वनस्पतीच्या जगात ४३ प्रजाती असून भारतामध्ये १२ प्रजातींची नोंद झाली आहे.

राजापूर तालुक्यातील आबासाहेब मराठे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अरुण चांदोरे, त्यांचे संशोधक विद्यार्थी देविदास बोरुडे, परेश भालेकर, गोखले एज्युकेशन सोसायटीचे एचपीटी आर्ट्स अँड आरवायके सायन्स कॉलेजमधील वनस्पतीशास्त्रचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. कुमार विनोद गोसावी, त्यांचे संशोधक विद्यार्थी नीलेश माधव यांनी या नवीन फुलवनस्पतीचा शोध लावला आहे.

या नव्या प्रजातीच्या फुलवनस्पतीचा शोधनिबंध जगविख्यात न्यूझिलंड येथील जर्नल फायटोटाक्षा येथून प्रकाशित झाला. या संशोधनास आबासाहेब मराठे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. जी. पवार, डॉ. के. एन. गांधी, सीनियर नोमनक्लेचर रजिस्टर, हार्वर्ड विद्यापीठ हर्बेरियम, केंब्रिज, डॉ. शरद कांबळे, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, नवी दिल्ली येथील भारत सरकारचे विज्ञान व तंत्रज्ञान संशोधन मंडळाने या संशोधनास मदत केली.

नव्या फुलवनस्पतीची वैशिष्ट्ये

  • बोटॅनिकल नाव ः डिपकाडी जनाई-श्रीरंगी

  • डिपकाडी कोंकनेस वनस्पतीच्या जवळची

  • 'गायमुखी' किंवा 'सुईची भाजी' असेही म्हणतात.

  • शतावरी कुळातील, बी, फळे लहान

  • फुले पांढरी व गायमुखीपेक्षा लहान

  • जुलै ते ऑगस्ट फुले, फळे येण्याचा कालावधी

का देण्यात आले यांचे नाव?

नव्या फुलवनस्पतीला 'जनाई' हे नाव गोवा विद्यापीठामध्ये वनस्पतीशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. एम. के. जनार्दन यांच्या नावावरून देण्यात आले. 'श्रीरंगी' हे नाव कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापाठीमधील डॉ. श्रीरंग यादव यांच्या नावावरून देण्यात आले आहे. या दोन्ही प्राध्यापकांचे वनस्पतीशास्त्रात मोठे योगदान आहे. त्यांच्या योगदानाची नोंद घेऊन त्यांचे नाव देण्यात आल्याची माहिती प्रा. डॉ. अरुण चांदोरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Main Exam 2026 Postponed : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 3 ऑक्टोबरपासून होणाऱ्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; आयोग लवकरच जाहीर करणार नव्या तारखा

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

Ladki Bahin Yojana ₹1500 Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 ऐवजी किती पैसे जमा झाले? घरबसल्या मोबाईलवर मिनिटांत तपासा रक्कम; कशी पाहाल स्टेटस?

Latest Marathi News Live Update: ९० कोटींच्या निविदेसाठी आयुक्तांना धमकी

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

SCROLL FOR NEXT