Demand for arrest along with resignation of Anil Parab 
कोकण

नितेश राणेंनी साधली संधी ; सत्ताधारी शिवसेनाला कोंडीत पकडण्याची....

सकाळ वृत्तसेवा

कणकवली (सिंधुदुर्ग) : एसटी महामंडळाच्या मोफत सेवा देण्याच्या निर्णयामध्ये 24 तासाच्या आत बदल झाल्याने आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसनेला कोंडीत पकडण्याची संधी साधली आहे. अनिल परब यांनी राजिनामा द्यावा आणि त्यांना पहाटेच अटक करावी अशी मागणी ते एका ट्वीटच्या माद्यमातून करू लागल्याने सिंधुदुर्गाचे राजकारण तापू लागले आहे.


राणेकुंटुंबीय आणि शिवसेना यांचे विळ्या भोपळ्याचे नाते सर्वशृत आहे. मिळत्या राजकिय संधीचा फायद्या घेण्यासाठी आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे हे संधी साधत असतात. आतातर राज्याच्या परिवहन मंत्र्याच्या निर्णयावरू मोठा गदारोळ सुरू आहे. सोमवारी ठाणे जिल्हातील काही आगारात एसटीच्या प्रतिक्षेसाठी राज्यातील नागरिक आणि परप्रांतीयांची गर्दी उसळली होती. यावर राजकार तापताना दिसत आहे.  राज्यात लॉकडाऊनच्या काळात एसटी प्रवासाबद्दल चुकीची माहिती दिल्याबद्दल परिवहनमंत्री अनिल परब यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी भाजपने केली आहे.

 अनिल परब यांच्या राजिनाम्यासह अटकेची मागणी

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी तर परब यांना  अटक होणार का, असा प्रश्न विचारला आहे. एसटी आदेश काढत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यातून राज्यातील सर्व एसटी स्थानकांवर त्यातून गर्दी झाली. परब हे बेजबाबदारपणे वागल्याने हजारो नागरिकांचे हाल झाले. सोशल डिस्टन्सिंग पाळले न गेल्याने कोरोना संसर्गाचा मोठा धोका निर्माण झाला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी भाजपने केली.  


यावर आमदार श्री. राणे यांनी आपल्या ट्टीटमध्ये म्हटले आहे की, चुकीची माहिती दिली आणि वांद्रेला गर्दी झाली म्हणून पत्रकार  राहुल कुलकर्णीला महाराष्ट्र सरकारने अटक केली. आता मंत्री परब यांनी चुकीची माहिती दिली म्हणून एसटी डेपोच्या बाहेर गर्दी झाली.मग ही माहिती देणारे मंत्री अनिल परब यांना तशाच पध्दतीने पहाटे अटक होणार का, असा सवाल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विचारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pratap Sarnaik : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Priyank Kharge statement : प्रियांक खर्गेंंचं हिंदू धर्माबाबत मोठं विधान! ; निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला पडणार महागात?

Puja Khedkar: पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा; सोमवारी पुन्हा बंगल्याची झडती, नेमकं काय घडलं?

NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?

Latest Marathi News Updates : एससी आरक्षण बदलल्याचा खोटा प्रचारः राहुल डंबाळे

SCROLL FOR NEXT