kokan sakal
कोकण

खेर्डी औद्योगिक वसाहतीत 9 कामगारांना डेंग्यू

खेर्डी येथील औद्योगिक वसाहतीतील नऊ कामगारांना डेंगीची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : सर्वत्र गणेशोत्सवाचा माहोल असतानाच शहरालगतच्या खेर्डी येथील औद्योगिक वसाहतीतील नऊ कामगारांना डेंगीची (Dengu) लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या घटनेमुळे आरोग्य विभागाची तारांबळ उडाली असून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव (Jyoti Yadav) यांनी या भागात तत्काळ सर्वेक्षणाबरोबरच फॉगिंग करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे आरोग्य विभागाने सर्वेक्षण सुरू केले.

कामथे उपजिल्हा रुग्णालयात या रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती डॉ. यादव यांनी दिली. २२ जुलैच्या महापुरानंतर चिपळूण शहर परिसरात डेंगी तसेच डेंगीसदृश रुग्ण आढळून आले होते; मात्र नगरपालिका व आरोग्य विभागाने वेळीच दखल घेतल्याने शहरात डेंगीची साथ पसरली नव्हती. चिपळूण तालुक्यात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार येथील तालुका आरोग्य विभागामार्फत गावी आलेल्या चाकरमान्यांची कोरोना चाचणी करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. याशिवाय लसीकरणाचा वेगही वाढविण्यात आला आहे.

संपूर्ण यंत्रणा या कामात व्यग्र असतानाच गुरुवारी शहरालगतच्या खेर्डी एमआयडीसी परिसरातील नऊ कामगारांना डेंगीची लागण झाल्याचे उघड झाल्याने आरोग्य विभागाची धावपळ उडाली. तत्काळ या रुग्णांना कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हे कामगार एका बेकरीमधील असल्याची प्राथामिक माहिती समोर आली आहे

मलेरिया विभागाची टीमही दाखल

परिसरात डेंगीची साथ पसरू नये यासाठी शुक्रवारी आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण करून आजूबाजूच्या भागाचे फॉगिंग करण्यात आले. तसेच जिल्हा मलेरिया विभागाची टीमही दाखल होऊन पाहणी करणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: रवींद्र जडेजाचा 'तो' फोटो, साक्षीची Video शूटींग अन् MS Dhoni फक्त रडायचाच बाकी होता, Viral Moment

MBA: नफा आणि निसर्ग दोन्ही महत्त्वाचे! MBA मध्ये 'कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी' आणि 'ग्रीन फायनान्स' या नव्या विषयांना मोठी मागणी

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरण: आज 3.30 वाजता महत्त्वाची सुनावणी

Radhanagari Dam : राधानगरी धरण सेवाद्वार नूतनीकरणासाठी ८८ कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता

Bilimora Waghai Railway: १०० वर्षांची ‘मिनी ट्रेन’ आजही धावते; बिलीमोरा-वाघई रेल्वे आदिवासींची जीवनवाहिनी

SCROLL FOR NEXT