Development funds will be received for Chiplun Devrukh
Development funds will be received for Chiplun Devrukh 
कोकण

चिपळूण, देवरूखसाठी इतका कोटी मिळणार विकास निधी...

सकाळ वृत्तसेवा

संगमेश्‍वर - चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील चिपळूण शहर पालिका आणि देवरूख नगरपंचायत हद्दीतील शहराच्या विकासासाठी सरकारी तिजोरीतून ठोक तरतुदीअंतर्गत १० कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश आले असून, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून देवरूख नगरपंचायतीला मिळालेला हा पहिलाच भरीव निधी आहे.

आमदार शेखर निकम निवडून आल्यावर तीन महिन्यातच विकासकामांचा धडाका लावला आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे चिपळूण नगरपालिका आणि देवरूख नगरपंचायत विकासासाठी निधीची मागणी केली. त्यामध्ये प्रामुख्याने चिपळूण शहरातील पेठमाप आणि मुरादपूरला जोडणारा पूल यासाठी सात कोटीची मागणी केली होती. तसेच देवरूख शहरातील विकासकामासाठी तीन कोटी अशी मागणी करत त्याचा पाठपुरावा केला. याला यश येऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठोक तरतुदीतून या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. 

यात देवरूखसाठी बहुउद्देशीय सभागृह बांधण्यासाठी ६० लाख, शाळा नं. २ जवळील बंधारा बांधण्यासाठी २५ लाख, शहरातील चोरपऱ्या ते शिवाजीचौक हा मुख्य रस्ता डांबरीकरण करणे यासाठी १० लाख, सावरकरचौक सुशोभीकरणासाठी १५ लाख रुपये, मैत्री चौकाचे सुशोभीकरण करण्यासाठी १५ लाख, प्रभाग १२ मध्ये बगीचा करण्यासाठी २० लाख, शहरात मध्यवर्ती भागात नवीन बगीचासाठी १५ लाख या महत्वाच्या कामांचा समावेश आहे. उर्वरित निधी हा अंतर्गत रस्ते आणि गटारे बांधणे, वहाळ बांधणे, संरक्षक भिंती बांधणे यासाठी मंजूर करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसी कंपनीत भीषण स्फोटात आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू, 64 जखमी, संख्या वाढण्याची भीती

Lok Sabha Election 2024 : सहाव्या टप्प्यातीलप्रचार थंडावला! देशातील ५७ मतदारसंघांत शनिवारी मतदान

Pune Porsche Accident : अपघातानंतर पळून जाण्याचे कारण काय? विशाल अग्रवाल यांची पोलिसांकडून कसून चौकशी

Dombivli MIDC Blast : डोंबिवली MIDC दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत; CM एकनाथ शिंदेंची घोषणा

Pune Porsche Accident: '...तर तुला मारून टाकेन'; कल्याणीनगर अपघातातील आरोपीच्या आजोबाचं आणखी एक अंडरवर्ल्ड कनेक्शन आलं पुढे

SCROLL FOR NEXT