bjp logo 2.jpg 
कोकण

भाजपमध्ये ‘नाराजी नाट्य' ; देवगडात जुन्या कार्यकर्त्यांची बैठक

सकाळ वृत्तसेवा

देवगड : भाजप (Bjp)जिल्ह्यात विस्तारत असतानाच विश्‍वासात न घेता निर्णय घेतले जात असल्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांमधील नाराजी वाढत आहे. देवगड जामसंडे (Devgad,Jamsande)नगरपंचायत कार्यक्षेत्रातील अशा कार्यकर्त्यांनी एकत्रित बैठक घेऊन पक्षीय नेतृत्वाकडे नाराजी कळवल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे देवगड जामसंडे शहरातील वातावरण ढवळून निघणार आहे. भाजप विस्तारत असतानाच जुन्या कार्यकर्त्यांमधील नाराजी वाढत चालली आहे. याबाबत जुन्या कार्यकर्त्यांनी पक्षाकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत लक्ष वेधले आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कार्यकर्ते कित्येक वर्षे पक्षाचे निष्ठेने काम करीत आहेत. राजकारणाजून समाजकारण करणे जास्त सोयीचे होत असल्याने त्यादृष्टीने भाजप चांगल्या पध्दतीने काम करीत होता. पक्षाची ध्येयधोरणे आणि पक्षाचे विचार अतिशय उच्च असल्याने त्याकडे कार्यकर्त्यांचा ओढा होता; परंतु अलीकडे जुन्या पक्ष कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार केला जात नाही. प्रभागवार समस्या जाणून घेतल्या जात नाहीत. विकास कामे करताना कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेतले जात नाही. ठराविक नगरसेवकांच्या प्रभागातच विकास कामांचा महापूर येतो आणि इतर प्रभागात कामांची वाणवाच आहे. त्यामुळे सामान्य जनतेबरोबरच पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना वाढीस लागली आहे. याची जाणीव पक्षीय नेतृत्वाला असणे गरजेचे असूनही तसे दिसत नाही.

भाजप कार्यकर्त्यांमध्ये निष्ठेची भावना आणि स्वाभिमान अंगी मुरलेला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना विचारात न घेता विभागातील कोणताही निर्णय घेण्याची प्रकीया कार्यकर्त्यांना मान्य नाही. त्यामुळे पक्षाकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांना अशाच पध्दतीने वागणूक दिली जाणार असल्यास त्याचा पक्ष वाढीच्या किंवा कार्याच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांची पक्षाला गरज नसल्यास तसे पक्षाकडून कार्यकर्त्यांना सांगण्यात यावे म्हणजे कार्यकर्ते पुढील निर्णय घेण्याला मोकळे होतील, अशा भाषेत कार्यकर्त्यांनी पक्षीय नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केली असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे.

नाराजी दूर झाल्याचा दावा

देवगड जामसंडे शहरातील नाराज कार्यकर्त्यांची आज पक्ष कार्यालयात आपल्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेण्यात आली. कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घेऊन त्यावर सकारात्मक तोडगा काढण्यात आला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी दूर झाली असल्याचा दावा भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी ‘सकाळ’ शी बोलताना केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT