कोकण

कोकण : दुबळेश्वर मंदिराला ना दार, ना भिंती

श्रावण सोमवारी दर्शन; विहिरीच्या खोदकामावेळी सापडली शिवपिंड

प्रमोद हर्डीकर

साडवली : कोरोनामुळे (covid-19) गेल्यावर्षी आणि यंदाही मंदिरे बंद राहणार आहेत. यामुळे श्रावण सुरू झाला आणि पहिलाच श्रावण सोमवार आल्याने नागरिकांना मंदिरात जाता येणार नाही. यामुळे देवरुख परिसरातील नागरिकांना व भाविकांना नदी शाळेजवळील श्री दुबळेश्वर (dubaleshwar temple) मंदिराचा आधार आहे. दुबळेश्वर मंदिराला ना दार, ना भिंती. यामुळे बाराही महिने हे मंदिर सर्वांसाठी दर्शनासाठी खुले असते. (konkan update)

देवरूख (devrukh) वरची आळी मार्गावर हे दुबळेश्वर मंदिर आहे. याला दार नाही की भिंती नाहीत. हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. नवसाला पावणारे अशी दुबळेश्वराची ख्याती आहे. कोरोना काळात मंदिरे बंद असल्याने भाविक दुबळेश्वराचे दर्शन घेतात. कोरोनाचे नियम पाळले जातात. देवरूख परिसरातील मित्रमंडळी एकत्र येऊन येथील उत्सव साजरे करत असतात. महाशिवरात्र व श्रावणातले सोमवार या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येत असतात. दरम्यान, आपण गेली पन्नास वर्षे दुबळेश्वराची पूजाअर्चा करत आहोत, असे पुजारी रेडीज यांनी सांगितले.

मंदिर बंदिस्त करता येणार नाही, असा कौल

दुबळेश्वर मंदिर बंदिस्त करता येणार नाही, असा कौल आहे. यामुळे आम्रवृक्षाच्या छायेत दुबळेश्वर वसलेला आहे. हे देवस्थान नवसाला पावले, म्हणून बाबा सावंत यांनी कठडा बांधला.

..म्हणून खोदकाम थांबवले

या मंदिराबाबत बोलताना मंदिराचे पुजारी बाळशेठ रेडीज यांनी सांगितले, पूर्वीच्या काळात या भागातील रहिवाशांना पिण्याचे पाणी मिळत नव्हते. यासाठी जोशी, पत्की, मुगरे, सरदेशपांडे यांनी नदीजवळ विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. या विहिरीचे खोदकाम सुरू असताना या लोकांना शिवपिंड व नंदी आढळून आली. म्हणून खोदकाम थांबवले. तेव्हापासून नंदी व शिवपिंड दुबळेश्वर नावाने प्रसिद्घ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑपरेशन टायगर! महाराष्ट्रात राजकीय भूकंप? उद्धव ठाकरे गटाच्या ७ खासदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिल्लीत गुप्त बैठक?

प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार; सोमवारपासून कामगार संघटनेचे घंटानाद आंदोलन, २९ जूनपासून बेमुदत धरणे...

Simcard Safety : मोबाईलचं नेटवर्क अचानक गायब होतंय का? हॅक झालेलं असू शकतंय तुमचं सिमकार्ड, 'या' ट्रिकने लगेच करा चेक

Latest Marathi News Live Update : मोफत सोयाबीन बियाणे वाटपात गोंधळ; टोकन न मिळाल्याने शेतकरी आक्रमक

Vijay Thalapathy Video Karnataka : मुख्यमंत्री थलपती विजय यांच्यासोबत कर्नाटकातील टोलनाक्यावर घडली अचंबित घटना, देवदर्शनासाठी जाताना कार स्वतः चालवली

SCROLL FOR NEXT