कोकण

ढोकमळे प्राणी संग्रहालयच्या प्रकल्पाला गती

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी: तालुक्यातील ढोकमळे (Dhokmale Zoo Project) (आरे-वारे जवळ) येथे 20 एकर जागेत उभारण्यात येणार्‍या प्राणी संग्रहालयाचा प्रस्ताव सेंट्रल झू अ‍ॅथॉरिटीला (Central Zoo Authority) 1 जुलैपर्यंत पाठविण्यात येणार आहे. संग्रहालयात वेगवेगळ्या प्रकारचे 45 प्राणी असणार आहेत. कोरोनामुळे (Covid 19) जमीन मोजणी लांबली होती. आता लगतच्या 188 हिस्सेदारांना नोटीस पाठवून 15 जूनपर्यंत जागेची मोजणी करून लवकरच संग्रहालयाच्या कामाला गती देण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत (Higher and Technical Education Minister Uday Samant)यांनी दिली.(dhokmale-zoo-project-submit-on-government-authority-information-by-uday-samant-kokan-news)

सामंत यांनी प्राणी संग्रहालयाबाबत दुरदृश्य प्रणालीद्वारे आज बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. या बैठकीला उप वनसंरक्षक क्लेमेट बेन, भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक मगर, विभागीय वन अधिकारी खाडे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, वास्तुविशारद व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सामंत म्हणाले, कोरोना महामारीमुळे तालुक्यातील काही महत्त्वाच्या प्रकल्पांचे काम मागे पडले होते. त्याला चालना मिळावी, यासाठी आम्ही आज झूम मिटिंग घेतली. यामध्ये तालुक्यातील ढोकमळे येथे होणार्‍या प्राणी संग्रहालयाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर चर्चा झाली. प्राणी संग्रहालयाचा सेंट्रल झु अ‍ॅथॉरिटीला 1 जुलैपर्यंत प्रस्ताव वाठविण्याचे निश्‍चित झाले. जागेची 15 जूनपर्यंत पार्टली मोजणी पूर्ण करण्याचा निर्णय झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: एकापेक्षा जास्त घरे घेणाऱ्यांना चाप बसणार, प्रशासन थेट कारवाई करणार; सरकारी योजनेतील घरांसाठी नवा नियम

रेकॉर्डवरच्या शेवटच्या माओवाद्याला परतीची साद; लोकशाही मार्ग स्वीकारण्याचे आवाहन; डाव्या पक्षांच्या नेत्यांनी घेतली कुटुंबाची भेट

Buldhana road accident news: नांदुरा-जळगाव जामोद महामार्गावर दोन दुचाकींची भीषण धडक; २१ वर्षीय युवक ठार, तिघे गंभीर जखमी

Beed : १० वर्षांपासून फरार पण, प्रचारसभांमध्ये सहभाग; अखेर शिवसेनेच्या बड्या नेत्याला बीडमधून उचललं

नाना पाटेकर गावात एकटे राहतात तरी कसे? म्हणाले- फार्महाउसवर गाय- बैल आहेत, सकाळचा नाश्ता झाला की...

SCROLL FOR NEXT