Dipoushav in Kunkeshwar Temple in Sindhudurg  
कोकण

पाहा दिपोत्सवाने उजळलेले कुणकेश्वरचे मंदीर (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा

देवगड - तालुक्‍यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर मंदिरात दिपावली वार्षिक उत्सवानिमित्त पाडव्याला (ता.28) रात्री मंदिरासह परिसरात दिपोत्सव साजरा करण्यात आला. रोषणाईमुळे मंदिर परिसर उजळून निघाला होता. सोमवार असल्याने यावेळी विविध ठिकाणच्या भाविकांनी गर्दी केली होती. सुमारे दहा हजार पणत्या प्रज्वलीत केल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष किशोर पेडणेकर यांनी दिली. दरम्यान, मंदिरात सुगम संगीताचा कार्यक्रमही सादर करण्यात आला. 

दिपावली पाडव्याचे औचित्य साधून मंदिर आणि परिसरात दिपोत्सव साजरा करण्यात आला. मंदिरातील गाभाऱ्यात तालुक्‍यातील वरेरी येथील ज्येष्ठ आंबा बागायतदार आणि उद्योजक विनायक पारकर यांच्या हस्ते दिपोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. श्री देव कुणकेश्‍वर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्‍वर विश्‍वस्त मंडळ, देवस्थानचे देवसेवक - मानकरी तसेच विविध मान्यवर, भाविक भक्‍तांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

विनायक पारकर यांचा ट्रस्टच्यावतीने सन्मान करण्यात आला. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अध्यक्ष किशोर पेडणेकर, सचिव बाळकृष्ण मुणगेकर, चंद्रशेखर बोंडाळे, संजय वाळके, पुंडलिक नाणेरकर, अरविंद वाळके, शैलेश बोंडाळे, प्रदीप मुणगेकर, व्यवस्थापक रामदास तेजम, सरपंच श्रुती बोंडाळे, आंबा बागायतदार रूपेश पारकर यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन करण्यात आले. सोमवार असल्याने भक्‍तांच्या उत्साहाला उधाण आले होते. 

अनेकांचे हात एकाचवेळी जुडले... 

मंदिरातील गर्भागृह, ध्यानगृह, सभामंडप यासह संपूर्ण मंदिर परिसरात बहुसंख्य दिप उजळण्यात आले होते. यासाठी अनेकांचे हात एकाचवेळी जुडले आणि बघताबघता मंदिर परिसर पणत्यांच्या प्रकाशात लख्ख उजळून निघाले. या उत्सवा दरम्यान आकर्षक विद्युत रोषणाई, रांगोळीचे आकर्षक कलात्मक नमुने पहावयास मिळाले. परिसरात विविध रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या. आकाशाला गवसणी घालणाऱ्या फटाक्‍यांनी अवकाशांत रंग भरल्याने वातावरण अधिकच मोहक बनले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Fraud: ऑफिसच्या कॉम्प्युटरवर व्हॉट्सॲप वापरताय? एक चूक पडू शकते महागात! व्हॉट्सॲप वेब वापरणाऱ्यांना सरकारचा इशारा

MS Dhoni: आयपीएल २०२७ च्या लिलावात एमएस धोनी दिसणार नाहीत? इरफान पठाणने सांगितलं CSK मधील माहीचं नेमकं काम

नाशिकच्या रामकुंड परिसरात खोदकामात सापडला १७०० वर्षांपूर्वीचा इतिहास, प्राचीन शिव मंदिरांचे अवशेष समोर

Latest Marathi News Live Update : बेलापूर कोर्टात खळबळ! जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर आरोपीची पाचव्या मजल्यावरून उडी; मृत्यू

‘पाखंडी’ अन् ‘धूर्त’! रामदेव बाबा यांची कथावाचक धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर जोरदार टीका, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT