The display of forts in Malgaon is remarkable 
कोकण

मळगावात किल्ल्यांचे लक्षवेधी प्रदर्शन

रुपेश हिराप

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - मळगाव येथे प्रथमच सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र-विभाग सिंधुदुर्ग सावंतवाडी, मळगावच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या प्रतीकृतींचे प्रदर्शन मळगाव येथील सुभाष नाटेकर यांच्या निवासस्थानी भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन 19 पर्यंत सुरू राहणार आहे. 

या प्रदर्शनात मनोहरगड, सिंधुदूर्ग किल्ला, मनसंतोषगड, सर्जेकोटगड, रांगणागड, भरतगड, रामगड, पारगड, हनुमंतगड, विजयदुर्ग किल्ला, देवगड किल्ला आदी किल्ल्यांचा समावेश आहे. या प्रदर्शनाचा प्रारंभ मळगाव येथील ज्येष्ठ नागरिक मनोहर राऊळ, सुभाष नाटेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी शरद शिरोडकर, विनायक राऊळ, उदय सावळ, निवास नाटेकर, आयोजक सुनील राऊळ, ज्ञानेश्‍वर राणे, निलेश नाटेकर, प्रज्योत खडपकर, शुभम खडपकर, रितेश राऊळ, सुधीर राऊळ, शुभम देऊलकर, चैतन्य नाटेकर, मनिष नाटेकर आदी उपस्थित होते. यावेळी सत्कार मळगावातील रूग्वाहिका चालक स्वप्निल ठाकर यांचा कोरोना योध्दा म्हणून प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. या प्रदर्शनासाठी सुनील राऊळ, ज्ञानेश्‍वर राणे, निलेश नाटेकर, प्रज्योत खडपकर, शुभम खडपकर, रितेश राऊळ, सुधीर राऊळ, शुभम देऊलकर, चैतन्य नाटेकर, मनिष नाटेकर आदींनी विशेष मेहनत घेतली. 

सहभागाचे आवाहन 
प्रदर्शन 19 पर्यंत आहे. मळगाव तसेच परिसरातील शिवप्रेमींनी हे प्रदर्शन आवर्जून पहावयास यावे, तसेच यापुढे सह्याद्री प्रतिष्ठान ग्रुपमध्ये तसेच प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात मनापासून सहभागी व्हावे, असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP MLA: पाणी प्रश्नावर आवाज उठवला तर BJP आमदाराने थेट पायच तोडले... नेमकं काय घडलं? अजून एकालाही अटक नाही

Maharashtra Rain: पुढील तीन दिवस महत्त्वाचे! मुसळधारेसह भरतीचा इशारा; हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Vanjari Reservation: मराठा आरक्षणासारखा वंजारी समाजाचा प्रश्न सुटणार का? ST मध्ये असल्याचा महत्त्वाचा पुरावा सापडला

Kolhapur Attack : विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या कोल्हापुरातील सायबर चौकात प्राणघातक हल्ला,पार्टीच्या वादातून मित्रांमध्ये वाद

MLA Rohit Pawar: सर्वसामान्यांना त्रास दिल्यास गय नाही: आमदार रोहित पवार; आपण जनसेवक आहोत विसरु नका, तीन हजार परत करायला लावले

SCROLL FOR NEXT