Konkan Graduate Election Voting  esakal
कोकण

Konkan Graduate Election : मोखाड्यात पदवीधर निवडणुकीच्या मतदानात राडा; मविआ-महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची

कोकण पदवीधर मतदार संघासाठी (Konkan Graduate Constituency) आज मतदान होते.

सकाळ डिजिटल टीम

महायुतीचे पदाधिकारी मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप काँग्रेसचे मोखाडा तालुकाध्यक्ष जमशिद शेख यांनी केला.

मोखाडा : कोकण पदवीधर मतदार संघासाठी (Konkan Graduate Constituency) आज मतदान होते. मोखाड्यात मतदान प्रक्रिया सुरू असताना पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून महाविकास आघाडी आणि महायुतीचे पदाधिकारी एकमेकांना भिडले. मात्र, उपस्थितांनी मध्यस्थी करून हे प्रकरण बाचाबाची होत असतांनाच मिटवले आहे. 

मोखाड्यात कोकण पदवीधर मतदार संघाचे मतदान (Voting) तहसीलदार कार्यालयात सुरू झाले होते. महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे (Niranjan Dawkhare) यांच्यासाठी मोखाडा नगरपंचायत (Mokhada Nagar Panchayat) लगत महायुतीचे पदाधिकारी मंडप टाकून बसले होते. तर, त्यांच्याच जवळच्या जागेत महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांच्यासाठी आघाडीचे पदाधिकारी बसले होते.

यावेळी महायुतीचे पदाधिकारी मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप काँग्रेसचे मोखाडा तालुकाध्यक्ष जमशिद शेख यांनी केला. यातूनच दोन्ही कडील पदाधिकारी भिडले. यावेळी भाजप मोखाडा तालुकाध्यक्ष संतोष चोथे आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जमशिद शेख हे एकमेकांवर धावून गेले. यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी युती व आघाडीच्या इतर पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून वातावरण शांत केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांचं आंदोलन सुरु; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT