जिल्हा बँक निवडणूक
जिल्हा बँक निवडणूक sakal
कोकण

जिल्हा बँक निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवली जाणार

रुपेश हिराप

सावंतवाडी ः आगामी जिल्हा बँक निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवली जाणार आहेत; मात्र ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी योग्य माणसाकडून प्रस्ताव आल्यास तसा विचार केला जाईल, असे मत जिल्हा बँक अध्यक्ष तथा शिवसेना नेते सतीश सावंत यांनी आज येथे स्पष्ट केले.

येथे आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते. यावेळी व्हिक्टर डान्टस, कणकवली नगरसेवक सुशांत नाईक, रुपेश गायतोंडे, नितीन गायतोंडे, मनोज राऊत आदी उपस्थित होते. श्री. सावंत म्हणाले, ``जिल्हा बँकेची निवडणूक ही नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मतदारांची अंतिम यादी आता जाहीर होणार आहे. ही निवडणूक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तीन पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविणार आहे. त्यासाठी पंधरा दिवसांपूर्वीच मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर यांची बैठक पार पडली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार निवडणुकीबाबत योग्य नियोजन सुरू आहे; मात्र ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी समोरून योग्य माणसाकडून तसा प्रस्ताव आल्यास विचार केला जाईल. त्याबाबतचा निर्णयही सर्वानुमते घेण्यात येईल.``

ते म्हणाले, ``गेल्या साडेसात वर्षाच्या कालावधीमध्ये आपण शेतकऱ्यांच्या बाबतीत केलेल्या कामातूनच आमचा आधीच प्रचार झालेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वेगळा प्रचार करण्याची आम्हाला काहीही गरज नाही. या जिल्ह्यात संख्यात्मक सहकार नसला तरी गुणात्मक सहकार नक्कीच आहे. आतापर्यंत जिल्हा बँकेमध्ये काम करताना कधीही आरोप होण्यासारखे काम केले नाही ही आमच्या दृष्टीने सकरात्मक बाजू आहे. शिवाय कर्ज प्रकरणांमध्ये कधीही राजकारण आणले नाही. आजही एकाही राजकीय पक्षाच्या लोकांचे कर्ज प्रकरण थांबवण्यात आलेले नाही.``

श्री. सावंत पुढे म्हणाले, ``अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. जिल्ह्यात जवळपास 1177 मतदार असून त्यापैकी 990 मतदार पात्र आहेत. येणाऱ्या नोव्हेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आम्ही नियोजन करत असून सर्वांना विश्वासात घेऊनच आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.``

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण कार्तिकचा फिनिशिंग टच अन् बेंगळुरूने साधली विजयाची हॅट्ट्रीक

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT