Do not want sanctuary, nor Compensation catch the elephant instead! 
कोकण

नको तुमचे अभयारण्य अन् भरपाईही.......त्यापेक्षा हत्तीला पकडा!

सकाळ वृत्तसेवा

साटेली-भेडशी (जि. सिंधुदुर्ग) : अभयारण्य आणि भरपाई नको; त्यापेक्षा हत्ती पकड मोहीम राबवा, अशी मागणी आज मोर्ले येथील ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक आणि वन अधिकाऱ्यांकडे केली. 

मोर्ले, केर, बांबर्डे, सोनावल, वीजघर परिसरात सध्या एका टस्कराचा वावर आहे. जवळपास दहा दिवसांत केर, भेकुर्ली, मोर्ले परिसरात तो टस्कर धुमाकूळ घालत आहे. या काळात त्याने अनेकांचा पाठलाग केला, तर शेती बागायतीचे नुकसान केले. मोर्लेत तर त्या टस्कराने दोन वेळा पाठलाग केला. त्या पार्श्‍वभूमीवर आमदार नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर, जिल्हाध्यक्ष संजय पडते, जान्हवी सावंत, शैलेश परब, विक्रांत सावंत, रुची राऊत, तालुकाप्रमुख बाबूराव धुरी, गणेशप्रसाद गवस, अशोक दळवी, संजय गवस, गोपाळ गवस, भगवान गवस, तन्मय नाईक, सतीश बोडेकर, संतोष मोर्ये, लक्ष्मण आयनोडकर, विजय जाधव, मिलिंद नाईक, बबलू पांगम, उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, वनक्षेत्रपाल दयानंद कोकरे आदींनी आज मोर्ले येथे भेट दिली. त्यावेळी झालेल्या बैठकीत मोर्ले सरपंच महादेव गवस, उपसरपंच पंकज गवस, ग्रामपंचायत सदस्य यांनी भाग घेतला. 

आता हत्ती आला तर त्याला रोखण्यासाठी तुमच्याकडे काय उपाय आहेत, असा प्रश्‍न श्री. पारकर यांनी श्री. चव्हाण यांना विचारला. त्यांनी आपल्याकडे काहीच उपाययोजना नाही, आम्ही केवळ फटाके पुरवू शकतो, असे सांगितले. दरम्यान, श्री. सावंत यांनी शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळायला हवी आणि हत्तींचा बंदोबस्तही व्हायला हवा, असे स्पष्ट केले. त्यासंदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक घेऊ, असे सांगितले. आमदार नाईक यांनी हत्तींचा तत्काळ बंदोबस्त करा, अशी सूचना केली. शेतकरी आणि गावकऱ्यांनी हत्तींसाठी अभयारण्य करू नका, त्यापेक्षा हत्ती हटाव मोहीम राबवून त्यांना नैसर्गिक अधिवासात पाठवा, अशी मागणी केली. 

लवकरच भेटीला येवू!

यावेळी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री सामंत यांनी हत्तीमुळे त्रस्त ग्रामस्थांच्या समस्या आमदार नाईक आणि श्री. सावंत यांच्याशी चर्चा करून जाणून घेतल्या. लवकरच आपण ग्रामस्थांची भेट घेऊ, असे सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

World Athletics Championships : नीरज चोप्राने एकाच प्रयत्नात केले सर्वांना गार, आता पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या कामगिरीकडे लक्ष

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

SCROLL FOR NEXT