कोकण

धक्कादायक: कोविड सेंटरमध्ये डॉक्‍टरच खेळू लागले क्रिकेट

गोविंद राठोड,खेड

खेड (रत्नागिरी) : खेड नगरपालिकेच्या (Khed Municipality)कोविड केअर सेंटरमध्ये कोविड (Covid Center)रुग्णांबरोबर तेथील डॉक्‍टरच क्रिकेट खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्रिकेट खेळ (cricket)रंगल्याचा व्हिडिओ व फोटो शहरात समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यामुळे हा प्रकार सर्वांच्या नजरेस आला. पालिका प्रशासनाने याची दखल घेतली आहे.

doctors started playing cricket in khed Kovid Center Ratnagiri news

गेले अनेक महिने नगरपालिकेच्या दवाखान्यात हे कोविड सेंटर सुरू आहे. येथे अंशतः बाधित रुग्णांवर उपचार केले जातात. काही दिवसांत हे रुग्ण बरे झाल्यानंतर दिवसभर काय करायचे, हा प्रश्‍न त्यांच्यासमोर असतो. त्यासाठी चुकीच्या पद्धतीने येथील कोविड सेंटरचा उपयोग केला जात असल्याची प्रतिक्रिया हा प्रकार उघड झाल्यावर व्यक्त होत आहे. रुग्णांवर सकारात्मक उपचार करण्याचे अनेक उपाय असताना, कोविड सेंटरमध्ये चक्क क्रिकेट खेळले जात असेल तर ते चुकीचे आहे.

विशेष म्हणजे कोविड सेंटरचे प्रमुखच जर याला परवानगी देऊन स्वतः त्यात सहभागी होत असतील तर रुग्णांसाठी ते नको असेल तरच नवल. पण असा खेळ कोविड रुग्णांसाठी कधी कधी जीवघेणाही ठरू शकतो. काही दिवसांपूर्वी या सेंटरमध्ये एका बरा झालेल्या रुग्णाने मायकल जॅक्‍सनसारखा डान्स केल्याचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता. समाजमाध्यमावर पसरलेल्या या प्रकाराची खेड पालिका प्रशासन गंभीर दखल घेणार आहे.

कोविड सेंटरमध्ये क्रिकेट खेळणे हा प्रकार फार गंभीर असून, तेथील प्रमुख डॉक्‍टरना कारणे दाखवा नोटीस देणार आहोत.

- प्रसाद शिंगटे, मुख्याधिकारी, खेड पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं स्वस्त झालं! सलग 4 दिवसांच्या तुफान तेजीला ब्रेक; आता 10 ग्रॅमचा नवा भाव किती?

Madhuri Elephant Return Kolhapur : 'माधुरी' हत्तीण महिन्याभरात कोल्हापूरला येणार!, वनताराची टीम नांदणीत पुनर्वसन केंदाच्या पाहणीसाठी दाखल

India WPI Inflation : देशात महागाईचा स्फोट! सामान्यांच्या खिशाला बसणार फटका, रोजच्या खर्चात होणार वाढ

FIFA World Cup: सहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या देशाचा बचाव भेदण्यास स्पेन अपयशी! दिवसातले चारही सामन्यांमध्ये बरोबरी

फुटबॉलचा महाथरार! स्वीडनने टुनिशियाला ५-१ ने उडवलं, तर ९० व्या मिनिटाला मँचेस्टर युनायटेडच्या स्टारने आयव्हरी कोस्टला कसं जिंकवलं? पाहा

SCROLL FOR NEXT