Dr. Anagha Tendulkar Online lecture by Gogte College in ratnagiri 
कोकण

कोविडचा परिणाम ; 'कुटूंबीयाना वेळ द्यायला संधी तर कौटुंबिक हिंसाचारात वाढ'

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोविड 19 महामारी भारतात येऊन सहा महिने झाले. त्यावर आधारित सामाजिक परिणामांचे निष्कर्ष काढणे घाईचे होईल. वैद्यकीय क्षेत्रातील गृहितकांना घेऊन ती सामाजिक क्षेत्राला सरळसोटपणे लागू करणे शक्य होणार नाही़  या महामारीच्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी सामाजिक शास्त्रज्ञांसमोर वेगवेगळे अभ्यास विषय आहेत. त्यासाठी अभ्यासक, संशोधकांनी शास्त्रीय परिमाणे विकसित केली पाहिजेत. सामाजिक वास्तव विभिन्न असल्याने या महामारीचा पडणारा प्रभावसुद्धा एकसारखा नाही़  तो समाजसापेक्ष आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ़  अनघा तेंडुलकर यांनी केले.


गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या सामाजिक शास्त्र मंडळाच्या वतीने प्रा. संजय जोशी स्मृती ऑनलाइन व्याख्यानात त्या बोलत होत्या. मुंबईच्या सोफिया महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागात कार्यरत डॉ. तेंडुलकर यांनी कोविड 19 नंतरचे जग आणि सामाजिक शास्त्रातील बदलत्या संकल्पना यावर आपले विचार मांडले.


त्या म्हणाल्या, कोविड अभ्यासासाठी संख्यात्मक संशोधनाबरोबरच गुणात्मक संशोधनाची आवश्यकता आहे. कोविड 19 चे अर्थक्षेत्रावरील परिणाम गंभीर आहेत. सामाजिक शास्त्रज्ञांना यापुढे स्थलांतराचा अभ्यास करताना या महामारीचा संदर्भ घेऊन पुढे जावे लागणार आहे़  शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम होत आहे़  विद्यमान अध्ययन-अध्यापन पद्धती, परीक्षा पद्धती, मूल्यमापनावर प्रभाव पडला आहे़  गुगल क्लासरूम सारखा पर्याय पुढे येताना दिसत आहे.


अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ़  किशोर सुाटणकर यांनी केला. समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा़  तुळशीदास रोकडे यांनी संजय जोशी यांच्या स्मृतींना उजाळा दिला. तर डॉ़  रामा सरतापे यांनी आभार मांडले. पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थी, प्राध्यापकांनी व्याख्यानाचा लाभ घेतला. सामाजिक शास्त्र मंडळाचे समन्वयक प्रा़ शिवाजी उकरंडे, प्रा. सचिन सनगरे आणि प्रा़  प्रशांत लोंढे यांनी विशेष परिश्रम घेतले.

अनेक सकारात्मक परिणाम

कुटूंबासारख्या सामाजिक संस्थेने सामाजिक शास्त्रज्ञांचे लक्ष वेधले आहे़  लॉकडाऊनमुळे एकीकडे लोकांना घरातच राहावे लागत असून कुटूंबीयाना वेळ द्यायला संधी मिळाली आहे. पण दुसरीकडे कौटुंबिक हिंसाचारात वाढ होत आहे. महामारीचे नकारात्मक परिणाम दिसत असले तरी अनेक सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत़  तरूण पिढी याकडे आव्हान म्हणून पाहत असल्याचे डॉ. तेंडुलकर म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kisan Credit Card Rule: किसान क्रेडिट कार्डचे नियम बदलले! शेतकऱ्यांना आता सहज कर्ज मिळणार; कागदपत्रांची कटकट कमी, RBI चा मोठा निर्णय

IND vs AFG, 3rd ODI: प्रसिद्ध कृष्णाच्या ५ विकेट्स, पण अफगाणिस्तानचा कर्णधार एकटा लढला अन् शतकासह भारतासमोर उभं केलं लक्ष्य

Omraje Nimbalkar: उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरेंबद्दल ओमराजे पहिल्यांदाच बोलले; कोर्टाच्या निकालावरही दिली प्रतिक्रिया

Udgir News : मुंबई–लातूर–बिदर सुपरफास्टला तीन अतिरिक्त डबे; १७२ अतिरिक्त प्रवाशांना लाभ

Maharashtra Weather: मेघगर्जनेसह उष्णतेचा इशारा! राज्यातील 'या' जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार; हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT