रत्नागिरी - अनेक समस्यापूर्ण रोगांमध्ये आयुर्वेदिक वैद्य यशस्वी चिकीत्सा करतात. परंतु राजाश्रय नसल्यामुळे आयुर्वेदाला अशा संधीच मिळत नाहीत. कोरोनावर इलाज करायला निष्ठावान आयुर्वेदतज्ञांना संधी मिळाली तर ते नक्कीच यशस्वी मार्ग शोधू शकतील. यासाठी एकच एक औषध आणि सर्वांसाठी एकच औषध असे स्वरूप असणार नाही. सोमल या द्रव्याचा उपचारासाठी उपयोग आवश्यक परिणाम करणारा ठरू शकेल, असा विश्वास येथील प्रसिद्ध वैद्यचुडामणी वैद्य रघुवीर भिडे यांनी व्यक्त केला.
सोमल हा वैद्य भिडे यांचा एमडी प्रबंधाचा विषय आहे. मुतखड्याच्या रुग्णांवर यशस्वी उपचार आणि एड्स बाधितांचे जीवन सुसह्य करण्यासाठी भिडे यांनी आयुर्वेदिक उपचार केले आहेत. याबाबत बोलताना भिडे म्हणाले, आयुर्वेद हे जुने शास्त्र आहे. नव्याने शोध लागणार्या व उद्भवणार्या विकारांबाबत स्पष्ट वर्णन त्यात मिळू शकत नाही. त्यासाठी आयुर्वेदिक सिद्धांतानुसार विचार करावा लागतो. कोरोनाचा विचारही तसाच करावा लागतो. कोरोनाचा रोगी प्रत्यक्ष तपासल्यानंतर शास्त्रानुसार अनेक बारकाव्यांची उकल करता येईल. सध्या माहित असलेल्या लक्षणांनुसार आगंतु सन्धिवात ज्वर असे याचे निदान करावे लागेल. याचे आशुकारित्व पाहता हा रोग दोषांचा सविष विकार करणारा आहे. लक्षणसमुच्चयानुसार आणि रोग्याच्या प्रकृतीनुसार अन्य आयुर्वेदिक औषधांची जोडीने योजना करावी लागेल. कोरोनामध्ये ज्या संस्थांवर परिणाम होतो. त्याचा बिघाड, दोष आणि धातु या परिभाषेत आयुर्वेद करतो. तीनही दोष परंतु वातकफप्रधान अशी ही विकृती मानावी लागेल. प्राणवह स्रोतस हे या रोगाचे अधिष्ठान असावे. त्यामुळे वातकफघ्न बल्य ज्वरघ्न अशी चिकीत्सा याचे उत्तर असेल. रोगाच्या व्याप्तीनुसार औषधांची योजनाही व्याप्त स्वरूपात करावी लागेल. प्रवाळपंचामृत, अमृताघन, रंक्णक्षार, सितोपलादि चूर्ण, मृगशृंगभस्म, श्वासकुठार, सुवर्णमालिनी वसंत, वसंत कुसुमाकर, मौक्तिकभस्म, यष्टीमधु, पिज्वळी, मधुमालिनीवसंत, समीरपन्नग वगैरे औषधे अवस्था पाहून दूध, मध, दुधाचा काढा अशा उपचारांनी प्रयत्न करता येईल.
रुग्णाने पाळावयाची पथ्ये
कोरोना रोगावर रोगाची व्याप्ती पाहून वैद्य वेगवेगळ्या औषधांनी उपचार करतील. सामान्य माणसाच्या आरोग्यासाठी सूचना द्यायच्या त्या वेगवेगळ्या गटांनुसार असतील. ताप वगैरे लक्षणांसह कोरोनाबाधित रुग्णाला सार्वजनिक विलगता आवश्यक आहे. उपचारांमध्ये लक्षणांनुसार बलवर्धन, गरम, ताजा आहार घेणे आवश्यक आहे. थंड पदार्थ खाऊ नयेत. पाणी उकळून प्यावे. छातीला तेल चोळून शेकावे. ज्येष्ठमधाच्या काढा किंवा पाण्याच्या गुळण्या कराव्यात. खोकला दमानाशक औषधांचा दुधाचा काढा बल सांभाळण्यासाठी घ्यावा. त्याने प्राणवहस्रोतसाला बल मिळून प्रतिकारशक्ती वाढेल. छाती पाठीला तेल चोळून शेकण्याने चांगला आराम मिळेल.
हे पण वाचा - प्रणयराधनात नर पक्ष्यांचा आवाज सर्वाधिक का असतो?
हे पण वाचा - ...तर उद्योजक आणखी जास्त अडचणीत येवू शकतात ; महाजन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.