due to range problem in konkan students face problem of online study in sindhudurg 
कोकण

ऑनलाइन शिक्षणात रेंजचा अडथळा ; कोकणात विद्यार्थ्यांना मिळतोय माळरानाचा आधार

सकाळ वृत्तसेवा

मळेवाड : ऑनलाइन शिक्षणासाठी ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने मुलांची मोठी दमछाक होत आहे; मात्र शिक्षण चुकू नये म्हणून मुलांची सुरू असलेली धडपड तर दुसरीकडे मुलांचे होत असलेले हाल पालकांना पाहवत नाहीत. अनेक भागांत मुले माळरानावर जाऊन शिक्षण घेत असल्याचे दिसून येते.

कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राला फटका बसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शाळा, कॉलेज बंद असल्याने मुले शिक्षण घेऊ शकत नसल्याने यावर तात्पुरता पर्याय म्हणून शासनाच्या सूचनांनुसार विद्यार्थ्यांना घरीच राहून शिक्षण घेता यावे, यासाठी ऑनलाइन शिक्षण पद्धती अमंलात आणण्यात आली. यानुसार शिक्षण संस्था व शासकीय शाळांमधून मुलांना ऑनलाइन पध्दतीने शिक्षण देणे सुरू झाले; मात्र यात नेटवर्कची मोठी समस्या निर्माण झाली ती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना.

अनेक ग्रामीण भागात कोणत्याही मोबाईल कंपनीचे नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांसमोर ऑनलाईन शिक्षण कसे घ्यायचे हा प्रश्‍न पडला; मात्र ग्रामीण भागातील मुलांमध्ये शिक्षणाची असलेली ओढ व जिद्द यामुळे गावात नेटवर्क नसताना ज्याठिकाणी नेटवर्क मिळेल तिथे जाऊन ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. यासाठी काही ग्रामीण भागातील विद्यार्थी माळरानावर, झोपडीत, उंच पाण्याच्या टाकीवर बसून ऑनलाईन शिक्षणाचे धडे घेत आहेत. 

असाच एक अनुभव आला तो सावंतवाडी तालुक्‍यातील धाकोरे गावात. या गावात कोणत्याही मोबाईल कंपनीचे नेट चांगले मिळत नसल्याने मुले या गावाच्या घनदाट जंगलातील उंच माळरानावर काही ठिकाणी मोबाईल रेंज मिळते त्याठिकाणी जाऊन ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. यामुळे या गावातील बरीच मुले एकमेकाला ॲडजस्ट करत आळीपाळीने याठिकाणी जाऊन ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. 

टॉवर शोभेच्या वस्तू

अनेक गावांतील बीएसएनएल कंपनीचे मोबाईल टॉवर शोभेचे बनले आहेत. गावात टॉवर आहे; पण नेट व्यवस्थित मिळत नाही. काही ठिकाणी टॉवरची मागणी करूनही टॉवर उभारलेले नाहीत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण देत असताना शासनाने ग्रामीण भागात मोबाईल टॉवर उभारून चांगले नेट उपलब्ध करून घ्यावे, अशी माफक मागणी विद्यार्थी करत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

SCROLL FOR NEXT