कोकण

कोकण : देवरुख, साडवलीत भूकंपाचे सौम्य धक्के

तीव्रता नसली तरी नागरिकांत भीतीचे वातावरण

प्रमोद हर्डीकर

साडवली : तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर वातवरणात बदल झाला आहे. दोन दिवस पावसाचा जोर होता. शुक्रवारी, शनिवारी चांगले ऊन पडले. मात्र आज (रविवार) सकाळी ९ वाजुन १० मिनिटांनी संगमेश्वर तालुक्यातील देवरुख, साडवली परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. हा धक्का विशेष करुन बिल्डींगमध्ये उंच ठिकाणी राहणार्‍या नागरिकांना तात्काळ जाणवला. (earthquake soft in devrukh sadavali in konkan area today morning)

काही घरात भांडी ठेवण्याचे रॅक हलण्याने भांड्यांच्या आवाजाने नागरीकांना भूकंप झाल्याची जाणीव झाली. भूकंपाची तीव्रता मोठी नसली तरी तो नागरीकांना जाणवला. दरम्यान कोकणात काही दिवसांपूर्वी झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे बरेच नुकसान झाले आहे. आज सकाळी अचानक साडवली, देवरुख परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या भूकंपाचे धक्के मात्र मोजता आलेले नाहीत. नागरिकांमधून सौम्य धक्के बसले असल्याचे सांगितले जात आहे. (earthquake soft in devrukh sadavali in konkan area today morning)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saptashrungi Devi Templ: सप्तशृंगी गडावर अन्न प्रशासनाचा छापा; ५.६२ लाखांची १,४०८ किलो मिठाई नष्ट, दर्शनाला जाणाऱ्यांनो सावधान..

Abhishek Sharma: विंडीजचे डावपेच हाणून पाडले;अभिषेक शर्मा;टी-२०तील आक्रमक फलंदाजीचे विश्लेषण

Rahul Gandhi: काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयातच फजिती? राहुल गांधींच्या SIR याचिकेत १४ त्रुटी, २२० रुपयेही कमी; सुनावणीच रखडली!

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, पाऊस परतणार?; कोकणात पावसाचा अंदाज

Solapur Road Accident: बहिणीला भेटून गावाकडे परतत होते; अज्ञात वाहनाची धडक, ४८ वर्षीय भावाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT