Eicher Tempo La fire in lanja 
कोकण

आयशर टेम्पोला आग ; ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना 

रवींद्र साळवी

लांजा - गवत घेवून जाणाऱ्या आयशर टेम्पोला विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने टेम्पोतील गवताने  पेट घेतला. ही घटना आज सकाळी ११.३० वाजण्याच्या दरम्यान लांजा पुनस-काजरघाटी रत्नागिरी मार्गावर लांजा तालुक्यातील कुर्णे घडशीवाडी येथे घडली.

 लांजा येथील धाडसी तरूण आणि ग्रामस्थांनी 
 टेम्पोतील गवत बाहेर काढून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

 लांजा तालुक्यातील सापुचेतळे येथील ग्रामस्थ शंकर गोरे यांनी आपल्या गुरांसाठी चारा म्हणून आसगे येथून गवताच्या वरंडी विकत घेतल्या होत्या. आज बुधवारी सकाळी 
आयशर टेम्पोत या गवताच्या वरंडी टाकून ते आसगे येथून सापुचेतळे येथे चालले होते. सकाळी ११.३० वाजण्याच्या दरम्यान लांजा पुनस-काजरघाटी रत्नागिरी मार्गावर लांजा तालुक्यातील कुर्णे घडशीवाडी येथे टेम्पो आला असता रस्त्यावरून गेलेल्या विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने टेम्पोतील गवताने  पेट घेतला. 
ही बाब टेम्पो चालक व  शंकर गोरे यांच्या लक्षात आल्यानंतर शेजारी असलेले अशोक शेट्ये यांच्यां घरातील पाणी मारून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. परंतु, आग नियंत्रनात येत न्हवती. यावेळी पुनस गावचे सरपंच इलियास बंदरी, राजू साळवी , राजू जाधव, दिनेश करंबळे,राकेश पांचाळ यांच्या मदतीनें पाण्याचा टेम्पो आणून आग विजविण्यात आली. तसेच स्थानिक ग्रामस्त मदतीला धावून आले. सर्वांच्या मदतीने ट्रक मधील गवत बाहेर काढण्यात आले व आगीवर नियंत्रण मिळवले .

या घटनेनंतर अग्निशमन बंबाची 
लांजा तालुक्याच्या दृष्टीने कशी आवश्यकता आहे ही बाब अधोरेखीत झाली.

 संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA Sangli Housing : अवघ्या 15 लाखांत हक्काचं घर! 'म्हाडा'चा 354 कुटुंबीयांना निवारा, 'या' योजनेतून अनेकांची स्वप्नपूर्ती; सांगलीत घरांची बंपर लॉटरी

Ekadashi Horoscope : उद्या देवशयनी एकादशीला बनतोय दुर्मिळ योग! 'या' 5 राशीच्या लोकांची मोठी इच्छा होणार पूर्ण; धनलाभ ठरेल गेमचेंजर

Latest Marathi News Live Update : धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत चर्चा नाही; राहुल गांधी यांचा आक्रमक पवित्रा

Vishnupuri Dam: प्रकल्प तहानलेलेच! विष्णुपुरीत ३३.४५ टक्के साठा

Bhokardan Theft: चहासाठी थांबल्या, नऊ लाख गेले; वाहनाची काच फोडून रक्कम लंपास, बचत गटाच्या महिलांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT