eight man shift isolation ward ratnagiri 
कोकण

रत्नागिरी - तबलिगीशी संबंधित आठ जण आयसोलेशनमध्ये

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी/दाभोळ - दिल्ली निजामुद्दीन येथील तबलिगी कार्यक्रमाला हजेरी लावलेले जिल्ह्यातील 8 जण निष्पन्न झाले असून त्यांना रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवले आहे. त्यामध्ये रत्नागिरी 5, राजापूर 2, दाभोळ मधील एकाचा समावेश आहे. त्यापैकी एकाचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. आणखी काही जणांची नावे पुढे येत असून प्रशासन त्यांच्या शोधात आहे. आरोग्य विभागाने ही माहिती दिली.


तबलिगी कार्यक्रमात हजेरी लावणार्‍यात रत्नागिरी जिल्ह्यातील काहींचा समावेश आहे. काल जिल्हा रुग्णालयात एका संशयिताला दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एकाचा अहवाल निगेटिव्ह आला. आज आणखी चार जण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांचे नमुने पाठविण्यात आले. उद्या सायंकाळी त्याचा अहवाल मिळणार आहे. 

लॉकडाऊन प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात  937 जण होम क्वारंटाईन मध्ये आहेत. या सर्वांच्या हातावर शिक्के मारले गेले आहेत. घराच्या दर्शनी भागात तशा सूचना लावलेल्या आहेत. या सर्वांनी घरातच राहवे, यासाठी प्रशासन लक्ष ठेवून आहे. 

संस्थात्मक क्वारंटाईन अंतर्गत एकूण 147 लोक दाखल आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात 18 व उर्वरित अन्य दवाखाने क्वारंटाईनसेंटर मध्ये दाखल आहेत. काल तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या 6 तपासणी नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्यात 9 तालुक्यांमध्ये 48 निवारागृहात 61 जणांच्या निवास व भोजनाची सोय करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त 874 जणांच्या भोजनाची व्यवस्था प्रशासनाने केली. यात रत्नागिरी 349, राजापूर 55, चिपळूण 421, खेड 40,  दापोली 9 याप्रमाणे मदत करण्यात आली आहे. कलम 144 चे उल्लंघन केल्याबद्दल रत्नागिरीत आज 29 दुचाकी जप्त करण्यात आल्या. तसेच एका अदखलपात्र गुन्ह्याची नोंद या काळात झाली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Jagatap Resignation : शरद पवारांच्या पक्षाला महापालिका निवडणुकीआधी पुण्यात मोठा धक्का; प्रशांत जगताप यांनी सोडलं शहाराध्यक्ष पद!

Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफीत रनफेस्ट! अहमदाबादमध्ये कर्नाटकचा महापराक्रम; झारखंडची मोठी धावसंख्या अपुरी

''तेव्हाच बदला घ्यायला पाहिजे होता'', अ‍ॅसिड हल्ल्यातील आरोपीची सोळा वर्षांनंतर निर्दोष मुक्तता; पीडितेचा टाहो

Pratap Sarnaik: नसबंदी नाही, बिबट्या दत्तक योजनेची गरज; प्रताप सरनाईक यांचं प्रतिपादन

Dhule Municipal Election : कोणाला 'हो' म्हणावे अन् कोणाला 'नाही'? इच्छुकांच्या गर्दीने भाजपचे नेते 'स्ट्रेस'मध्ये

SCROLL FOR NEXT