Eldest Coordinating Committee In Sindhudurg Kokan Marathi News  
कोकण

ज्येष्ठांना तक्रार नोंदवायची आहे... मग येथे भेट द्या.....

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबत ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा करून जिल्हास्तरावर ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दादा कुडतरकर यांनी दिली. 


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठांच्या समस्या आणि मागणीसाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू होते. पालकमंत्री उदय सामंत तसेच जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्यांबाबत गंभीर दखल घेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ज्येष्ठ नागरीक सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध समस्या मांडल्या. त्यावर जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनीही समस्या जाणून घेतल्या. 

समन्वय सनियंत्रण समिती
ज्येष्ठांची वयोमर्यादा ६० वर्षे ग्राह्य मानून एसटी प्रवास सवलत मिळावी. शासकीय रूग्णालयात ज्येष्ठांसाठी वेगळी सोय करावी. राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत मोफत आरोग्य सेवा द्यावी. पोलिसांनी ज्येष्ठांची सुरक्षितता व अन्य प्रश्‍नांमध्ये प्रयत्नशील रहावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.शिवाय शसकीय कार्यालयासह स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत १५ जून हा ज्येष्ठ नागरीक छळ प्रतिबंध जागृती दिवस, २१ सप्टेंबर हा जागतिक स्मृतीभ्रंश दिवस तर १ ऑक्‍टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. कुडतरकर, चंद्रकांत अणावकर, रविंद्र मुसळे, दत्ता शिरसाट, आबा केसरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

समितीतील पदाधिकारी असे
समस्या सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समिती स्थापन्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. या समितीत ज्येष्ठ नागरिकांचे दोन प्रतिनिधी असतील. शिवाय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक आयुक्त समाजकल्याण, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, नगर परिषदांचे मुख्याधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा महिला बालविकास अधिकाऱ्यांचा समावेश असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates : हिंदीविरोधातील स्टॅलिन यांच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा - संजय राऊत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT