election of gram panchayat for candidate disputes between family in ratnagiri 
कोकण

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ईर्ष्या ; उमेदवारीवरून काका-पुतण्यात कंदाल

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी एकत्रित निवडणुका लढणार असल्याने आघाडी विरुद्ध भाजप, अशी लढत अपेक्षित आहे. परंतु उमेदवारी मिळण्यावरून वाडीमध्ये सरळ सरळ दोन गट पडत असून भावकीतच कंदाल सुरू झाल्याचे चित्र आहे. वाद टाळण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी राजकीय नेत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

जिल्ह्यात 479 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्वच पक्षांतील इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. प्रत्येकजण आपल्या लाडक्‍या नेत्याकडे शब्द टाकू लागला. पण गावातील छोट्या वाड्यांमधील वादामुळे उमेदवारी मिळण्यावरूनही भानगडी सुरू झाल्या. भावकीत कंदाल सुरू झाली आहे. 

रत्नागिरी शहरानजीकच्या एका मोठ्या ग्रामपंचायत निवडणुकीत विद्यमान सदस्याच्या वडिलांनी पुन्हा मुलासाठी तयारी केली होती. परंतु त्यांना तिकीट न देता भावाला उमेदवारी दिल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्या घरात जुंपली असून आता काका-पुतणे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवतात, की कसे, हे आगामी काळात कळेल. 

आरक्षण न पडल्याने हिरमोड 

या वेळी सरपंचपदाचे आरक्षण न पडल्याने नेमकी निवडणूक कशी लढवावी, याची रणनिती राजकीय पक्ष आखत आहेत. गावातील वजनदार नेत्यालाच उमेदवारी द्यायची व त्याला सरपंच बनवण्याची आखणी केली जात आहे. मात्र, आरक्षण वेगळेच पडले तर काय? हाही प्रश्‍न पक्षांसमोर उभा ठाकला आहे. स्वतः उभे राहण्याऐवजी पत्नी किंवा घरातील महिलेला उमेदवारी देण्याकडे कल दिसत आहे. 

भाजपकडे अनेकजण इच्छुक गळाला.. 

महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे तीन पक्ष एकत्र आहेत. परंतु, अजून आघाडीची बैठक झाली नसल्याने त्यांच्याकडून कोणाला उमेदवारी द्यायची, हे अद्याप निश्‍चित झालेले नाही. त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडे अनेकजण इच्छुक गळाला लागू शकतात. त्यासाठी भाजपनेही मोर्चेबांधणी केली आहे. 

तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्षांकडे खेपा 

काही संधीसाधू उमेदवार आघाडीकडे आणि भाजपकडेही संधी मिळत आहे का, याची चाचपणी करत आहेत. त्यामुळे स्थानिक नेते, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्षांकडे त्यांच्या खेपा सुरू झाल्या आहेत. परंतु हे पदाधिकारीसुद्धा नेमका शब्द न देता फक्त माहिती घेत आहेत. अर्ज भरण्यास सुरवात झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.  

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

SCROLL FOR NEXT