election of zp election of mayor in ratnagiri NCP and shiv sena party  
कोकण

..तर अध्यक्षपदाची निवडणूक आम्हीच लढवू; राष्ट्रवादीच्या आक्रमक भूमिकेमुळे शिवसेना कोंडीत

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : राज्यात महाविकास आघाडी असल्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये होऊ घातलेल्या सभापती निवडीत एक पद मिळावे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. सभापती पद दिले नाही, तर अध्यक्षपदाची निवडणूक लढवू, असा इशारा देत राष्ट्रवादीने शिवसेनेला कोंडीत पकडले. यामुळे पदाधिकारी निवडीत पेच निर्माण झाला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेची अध्यक्ष व सभापती निवड २२ मार्चला होत आहे. येथे शिवसेनेचे वर्चस्व असून, अध्यक्षपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे. त्यामधून उमेदवार निवडण्याचे आव्हानच आहे. याविषयी शिवसेनेत अंतर्गत घडामोडी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी सहीचे पत्र पालकमंत्री ॲड. अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांना दिले आहे.
दरम्यान, अध्यक्षपदाच्या शर्यतीत आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत यांचे नाव आहे. राष्ट्रवादीला सभापतीपद द्यायचे झाल्यास विक्रांत यांना अध्यक्षपद देता येणार नाही. विक्रांत यांना उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादी उमेदवार देणार. यामुळे सदस्य फुटण्याची शक्‍यताही आहे.

राष्ट्रवादीच्या पत्रातील मजकूर

रत्नागिरी जिल्हा परिषदेत मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या घड्याळ निशाणीवर १५ सदस्य निवडून आले आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेत विरोधी पक्षात आहे. पक्षाने गोपाळ पर्शुराम आडिवरेकर यांची गटनेता म्हणून नेमणूक केली आहे. तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. आता जिल्हा परिषदेतील सर्व समितीच्या सभापतींनी राजीनामा दिला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामधील घटक पक्ष म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषदेत कोणतेही एक सभापतीपद राष्ट्रवादीला मिळावे, अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी पक्षातर्फे आम्ही नाव पाठवू. कृपया या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा. सभापतीपद दिले नाही, तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवार उभा करेल.

"राज्यात असलेली महाविकास आघाडी रत्नागिरीतही होण्यासाठी राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार एक सभापती पद शिवसेनेने द्यावे. अन्यथा आमचे सदस्य कमी असले तरीही आम्ही अध्यक्षपदाची निवडणूक लढवू."

- बाबाजी जाधव, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT