electricity bill of rupees 21000 but meter not available for buyer in lanja ratnagiri case 
कोकण

ऐकावं ते नवलचं ; वीज मीटर तर दिले नाहीच, बिल मात्र आले २१ हजाराचे

सकाळ वृत्तसेवा

लांजा (रत्नागिरी) : ग्राहकाला वीज मीटर न देताच महावितरण कार्यालयाने सुरवातीला १६ हजार ९३० व त्यानंतर थकबाकीसह २१ हजार ४८० रुपयांचे वीजबिल देण्याचा अचाट पराक्रम केला आहे. महावितरणच्या या अनागोंदी कारभाराबद्दल भांबेड येथील सतीश शंकर राणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

भांबेड येथील रहिवासी असणाऱ्या सतीश राणे यांनी २०१६ मध्ये लांजा बाजारपेठेतील सद्‌गुरू कॉप्लेक्‍स या इमारतीमध्ये एक गाळा विकत घेतला होता. त्यानंतर वीजमीटरसाठी लांजा येथील महावितरणच्या कार्यालयाकडे २९ ऑगस्ट २०१६ ला अर्ज आणि २ हजार २७५ रुपये भरले. मात्र, त्यांना मीटर देण्यात आले नाही. त्यानंतर महावितरणकडून २३ सप्टेंबर २०१९ ला सतीश राणे यांना लांजा कार्यालयाने २३ सप्टेंबर २०१९ ला १६ हजार ९३० इतके वीज बिल देण्यात आले.

मीटर नसताना त्याचे बिल कसे काढले, याबाबत शाखा अभियंता माळी यांनी विचारले. मात्र त्यांना उत्तर देता आलेले नाही. राणे यांनी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. मात्र त्यानंतरही महावितरणच्या कारभारात सुधारणा झाली नाही. महावितरणने पुन्हा सतीश राणे यांना थकबाकीसह २१ हजार ४८० रुपये बिल भरण्यासाठी तगादा लावला आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman Nina Kutina: गोकर्ण जंगलाच्या गुहेत सापडलेली रशियन महिला ८ वर्ष स्वयंपाक कशी करायची? मुलींना काय खायला द्यायची?

'26 निष्पापांच्या हत्यांमागे पाकिस्तानचा हात, त्या दहशतवाद्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार'; जम्मूच्या उपराज्यपालांचा कडक इशारा

Gokul Milk Politics : आप्पा महाडिकांनी थेट मुश्रीफांनाच घेतलं अंगावर, कारभार चांगला, मग ‘टोकण’ कशासाठी?

Nagpur Crime: कर्जदाराचे अपहरण, जिवे मारण्याची धमकी; सावकारासह चौघांना अटक

Latest Marathi News Updates : भाजप आमदार बसवराजविरुद्ध गुंडाच्‍या खूनप्रकरणी एफआयआर दाखल

SCROLL FOR NEXT