Elephant Seen On Ker Bhekurli Road Sindhudurg Marathi News  
कोकण

सिंधुदुर्गात `येथे` हत्तीने दोन वेळा दिला `हा` इशारा

सकाळवृत्तसेवा

साटेली भेडशी ( सिंधुदुर्ग ) - केर भेकुर्ली रस्त्यावर गावकऱ्यांनी टस्कराचा थरार अनुभवला. दिवसा राजेशाही थाटात रस्त्यावरून ऐटीत फेरफटका मारणारा टस्कर रात्री मात्र आक्रमक झाला. त्याला पिटाळण्यासाठी मागून गेलेल्या गावकऱ्यांना त्याने दोन वेळा चित्कार करीत 'चले जाव'चा इशारा दिला. एरवी गलका करत त्याच्यामागून धावणाऱ्या गावकऱ्यांची त्याचा हटके पवित्रा बघून मात्र पाचावर धारण बसली. 

गेल्या अठरा एकोणीस वर्षात दोडामार्ग तालुक्‍यातील बहुतांश गावांनी हत्तींचा वावर अनुभवला आहे. काहींना जवळून तर काहींना दुरून त्यांचे दर्शन झाले असले तरी इतक्‍या वर्षांनंतरही हत्तीबद्दलचे अप्रूप कायम आहे. दुसरीकडे आता हत्तींनाही माणसांची सवय झाली आहे. सुरवातीच्या काळात हत्तींचा वावर जंगल भागातच असायचा.

रात्रीच्यावेळी ते शेती बागायतीत घुसून नुकसान करायचे. आता त्यांना स्थळकाळाचे बंधन लागत नाही. कधीही आणि कुठेही ते आता स्वैरपणे संचार करू लागलेत. कधी त्यांनी भीतीपोटी पाठ धरल्याने तर कधी माणसाने भीतीपोटी पळ काढल्याच्या घटना घडल्या आहेत. यात काहीजण जखमीही झाले आहेत. 

केर भेकुर्ली रस्त्यावर सरपंच मिनल देसाई यांचे पती मोहन यांनी भरदिवसा टस्कराचा थरार अनुभवला. ते चार चाकी गाडीतून जात असताना त्यांच्यासमोर रस्त्यावरच आला. त्याला पाहून त्यांच्यासह सोबतच्या माणसांची भंबेरी उडाली. काहींनी त्याचे फोटो आणि व्हिडिओही काढले. त्यावेळी टस्कराचा मूड मात्र प्रसन्न होता; पण सायंकाळी मात्र तो बदलला. त्याच रस्त्यावर तो फेरफटका मारत असताना दुचाकी व चारचाकीने गेलेल्या गावकऱ्यांना तो दिसला.

काहींनी त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला; पण आज त्या सगळया भागावर त्याचे राज्य होते. त्याने सोंड हवेत उंचावून मोठ्याने चित्कार केला आणि आक्रमणाचा पवित्रा घेतला. त्याचा तो पवित्रा बघून त्या सर्वांचे धाबे दणाणले आणि पळापळ झाली. केर, भेकुर्ली, मोर्ले, वीजघर, बांबर्डे परिसरात अलिकडे हत्तींचा असा वावर सुरु आहे. त्यातून त्याची एक वेगळीच दहशत तिथल्या माणसामाणसावर आहे. 

हत्ती सांभाळणे सर्वांची जबाबदारी 
हत्ती आणि मानव यांच्यातील वर्षानुवर्षे सुरु असलेला संघर्ष अधूनमधून नवनव्या वळणावर आणि नवनव्या स्वरूपात पाहायला मिळतो आहे. असे असले तरी हत्ती महाराष्ट्राचे वैभव आहे. त्याचा सांभाळ करणे ही आपली जबाबदारी आहे हे विसरून चालणार नाही. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Year Ender 2025 : IPO गुंतवणूकदारांची लॉटरी! या वर्षातील टॉप 7 IPO; काहींनी पहिल्याच दिवशी दिला 60% रिटर्न

Latest Marathi News Live Update : - त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे ४ वाजेपासून दर्शनासाठी खुले होणार

Shahada News : खळबळजनक! शेतकऱ्यांच्या हक्काच्या युरियावर डल्ला; शहाद्यात बनावट 'डीईएफ' कारखान्याचा पर्दाफाश

Wani News : सप्तशृंगगडाचा घाटरस्ता की मृत्यूचा सापळा? वर्षभरापासून काम रखडल्याने भाविकांचा जीव टांगणीला!

Uruli Kanchan Crime : उरुळी कांचन खून प्रकरणाचा उलगडा; सोलापुरातून २ आरोपी अटकेत; वैयक्तिक वादातून हत्या झाल्याचे निष्पन्न!

SCROLL FOR NEXT