entry of seven corporator in shiv sena from bjp in vaibhavwadi sindhudurg 
कोकण

'शिवसेना हे माझं पहिलं प्रेम ; 'व्हॅलेंटाईन डे' निमीत्ताने सात नगरसेवक माझ्याकडून भेट'

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : 'व्हॅलेंटाईन डे' हा दोन-तीन दिवसावर आहे. शिवसेना हे माझं पहिलं प्रेम आहे, आणि जुन्या प्रेमाला कधी विसरायचं नसतं म्हणून मी माझे सात नगरसेवक शिवसेनेला दिले आहेत, असे वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केले आहे. वाभवे वैभववाडी नगरपंचायतीतून सात नगरसेनक आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनाला सांगितले. 

गृहमंत्री अमित शहा यांनी दोन दिवसांपूर्वीच कोकणचा दौरा केला. मात्र या दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी वैभवाडीतले सात नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर जात असल्याचे बोलले जाते आहे. 'व्हॅलेंटाईन डे' दोन-तीन दिवसावर आहे. शिवसेना माझं प्रेम आहे आणि जुन्या प्रेमाला कधी विसरायचं नसतं अशी प्रतिक्रिया आज भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली.

यावेळी ते म्हणाले, वैभव नगर पंचायतीची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. आणि आत्ताची परिस्थिती पाहिली तर तिथे एकही शिवसेनेचा उमेदवारी नाही. त्यांचा उमेदवार नसल्याने सातच्या सात उमेदवार शिवसेनेला दिले आहेत. वैभववाडीत शिवसेनेची परिस्थिती अशी आहे, की त्यांना उमेदवारी भेटली नसती. मग आता मी असताना आमच्या जुन्या प्रेमावर मी असा कसा अन्याय करू. शेवटी शिवसेना पक्ष हा हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. आणि बाळासाहेब आमच्या हृदयात आहेत. 

पुढे ते म्हणाले, लाइफटाइम मेडिकल कॉलेजच्या संदर्भात रुटीन फाइल क्लिअर करण्यासाठी राणे साहेबांनी फोन केला होता त्यावेळी उद्धव यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्याच्यावर सही केली. शिवसेनेला आम्ही दुसरं काही देऊ शकत नाही, आणि दिले तरी ते स्वीकारणार नाहीत. म्हणून 'व्हॅलेंटाईन डे' च्या निमित्ताने सात नगरसेवक त्यांना भेट देत आहे. त्यांचा त्यांनी स्वीकार करावा अशी माझी अपेक्षा आहे.

शिवसेनेत उत्साह, भाजपकडून दुर्लक्ष

वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचे 17 पैकी 17 नगरसेवक भाजपाचे आहेत. या नगरसेवकांची मुदत काही महिन्यापुर्वी संपली आहे. कोरोनामुळे या नगरपंचायतीची निवडणुक झालेली नाही. यात सात जण आता शिवसेनेत गेले आहेत; मात्र हा प्रवेश भाजपने फारसा मनावर घेतला नसल्याचे राणेंच्या प्रतिक्रीयेवरून स्पष्ट होत आहे. शिवसेनेच्या गोटात मात्र उत्साह आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कळंबा कारागृहात दंगा- आरडाओरड करण्यास मनाई केल्याने अधिकाऱ्याला मारहाण

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

CM Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य! आंदोलन करून गणेशोत्सवावर ताण आणू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT