ex central railway minister on konkan tour for tomorrow in sindhudurg 
कोकण

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू उद्या कोकण दौऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : माजी केंद्रीय रेल्वेमंत्री खासदार सुरेश प्रभू हे २ ते ७ जानेवारीपर्यंत सिंधुदुर्ग व रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकासकामांना भेटी यांबरोबरच शेतकऱ्यांचीही चर्चा करणार आहेत. 

प्रभू यांचा नियोजित दौरा असा ः २ जानेवारी सायंकाळी ५.३० वाजता गोव्याहून प्रयाण. आरोंदामार्गे सावंतवाडीकडे आगमन. सावंतवाडीमध्ये आरएसएस कार्यालयांमध्ये सहकार भारती, विद्याभारती, जनकल्याण समिती, डॉ. हेडगेवार सेवा प्रकल्प, राष्ट्रसेतीका समिती, किसान संघ, मजदूर संघ, अधिवक्ता परिषद, संस्कृत भारती या संस्था प्रतिनिधीशी भेट व चर्चा. ६:२० वाजता सावंतवाडी पालिकेला भेट व विकासकामासंदर्भात चर्चा.  

३ जानेवारीला सकाळी १० वाजता अणाव येथील कोकणातील विद्यार्थिनीसाठी मागील २० वर्ष अविरत शिक्षण देत असलेल्या मानव साधन विकास संस्था संचालित स्कूल ऑफ नर्सिंग अणावच्या भव्य इमारतीच्या भूमिपूजन व कोनशीला कार्यक्रमास उपस्थिती, ११ वाजता जनशिक्षण संस्था सिंधुदुर्ग व एएआय यांच्यावतीने होणाऱ्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींना १ हजार सायकल व महिला सक्षमीकरणासाठी महिलांना १००० शिलाई मशिन वाटप कार्यक्रमास उपस्थिती, १२:२५ वाजता जनशिक्षणच्या नूतन इमारतीस भेट, १२:४० वाजता ओरस येथे प्रधानमंत्री योजना व केंद्र शासीत योजनांचा आढावा बैठक, दुपारी २ वाजता एसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालय, पडवे येथे सदिच्छा भेट, ३:३० वाजता मराठा समाज हॉल कुडाळ येथे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी नवीन उपाय योजनेबाबत नाबार्ड व लुपिन फाऊंडेशन यांच्याशी चर्चा, नाबार्ड अंतर्गत स्थापित विविध शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकाना मार्गदर्शन, ४ वाजता कुडाळ भाजप कार्यालय भेट व विकास कामा संदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा, ४:३० बांबुला जागतिक पातळीवर पोहचविणाऱ्या कॉनबॅगला भेट, ५:०० वाजता कोकणच्या तरुणांसाठी प्रस्तावित कोकण क्रिडा प्रबोधीनीच्या क्रीडासंकुल जागेची पहाणी व मालवणकडे प्रयाण, ४ जानेवारीला ११:३० वाजता कणकवली भाजपा कार्यालयाला भेट याठिकाणी केंद्राचे रोजगार विषयक धोरण, विविध विधेयक याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा व मार्गदर्शन, १२:१५ वाजता फोंडा येथील (कै.) सुदन बांदिवडेकर यांच्या निवासस्थानी भेट, १:१५ वाजता खारेपाटण येथे रेल्वेमंत्री म्हणून भूमिपिजन केलेल्या खारेपाटण रेल्वेस्टेशन पहाणी व अधिकारी यांच्याशी चर्चा, तेथून रत्नागिरीकडे प्रयाण, ५ जानेवारीला रत्नागिरी येथे दौरा तर ६ जानेवारीला १०:३० वाजता मालवण मसुरे येथे पंचक्रोशी विकासासाठी स्थानिक शेतकरी बांधवांची भेट, १२ वाजता मालवण येथे समाजातील विविध संस्था प्रमुखांशी चर्चा, ३:३० वाजता नवीन शैक्षणिक धोरणाबाबत मार्गदर्शन नवीन शेतकरी धोरणाबाबत मार्गदर्शन, ४ वाजता मच्छिमार बांधवांशी चर्चा, ४:४५ वाजता विविध प्रश्‍नांबाबत स्थानिक जनतेसोबत चर्चा, ७ जानेवारीला १०:३० वाजता नागरी उड्डाणमंत्री असताना चालना दिलेल्या वेगुर्ले चिपी विमानतळास भेट, १२ वाजता आरवली वेतोबा मंदिर दर्शन, १२:२० वाजता स्थानिक नेत्यांशी चर्चा, मच्छीमार बांधवांसोबत चर्चा.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT