Ex MLA Parshuram Uparkar Comments On Government Officers
Ex MLA Parshuram Uparkar Comments On Government Officers  
कोकण

अजबच ! वाळू पैशातून अधिकाऱ्यांचे तिरूपती दर्शन 

सकाळवृत्तसेवा

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - राज्यातील सरकार व मंत्री बदलले; पण येथील अधिकाऱ्यांची मानसिकता बदललेली नाही. जिल्ह्यात अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाळू प्रकरणाबरोबरच वाळूच्या पैशातून काही अधिकाऱ्यांनी तिरूपती दर्शनही केल्याचा खळबळजनक आरोप मनसेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. 

श्री. उपरकर यांनी आज एमआयडिसी विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, तालुका सचिव राजेश टंगसाळी, कुणाल किंनळेकर, सुंदर गावडे आदी उपस्थित होते. श्री. उपरकर म्हणाले, ""येथील अधिकाऱ्यांची मानसिकता बदललेली नाही. सध्या जिल्ह्यात अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मालवण तालुक्‍यात महसूल कर्मचारी मारहाण प्रकरण झाले; मात्र या प्रकरणाची तक्रार देण्यात कोणी पुढे येत नाही. जिल्हाधिकारी यांना तक्रार द्यावी लागत आहे.

वाळू दराचा फटका येथील लोकांना बसत आहे, वाळूमध्ये काही पोलीस अधिकारी महसूल विभाग शासनाचे कर चुकवून स्वतःचे खिसे भरण्याचे काम करीत आहे. शंभर ते दीडशे ट्रक गोव्यात जातात. मोठ्या प्रमाणात हप्ता गोळा करण्याचे काम सुरू आहे. आपल्या देशात कोरोनाचा हाहाकार असताना महसूल विभागाचे काही अधिकारी वाळूच्या पैशातून तिरुपती दर्शन करत आहेत. आमच्याकडे आलेल्या आकड्यानुसार महसुलच्या ड्रायव्हरने वाळूची गाडी पकडायची 50 हजार रूपये घ्यायचे. जो गाडीमागे दोन हजार रुपये देत नाही त्यांच्यावर कारवाई करावी, जे सहकार्य करत नाही त्यांच्यावर कारवाई करावी, असा राजरोसपणे सावळा गोंधळ सुरू आहे. 25 हजार रूपये रॅम्प, 30 हजार रूपये होडीला, 40 हजार रूपये महसूल यंत्रणेचा दर ठरलेला आहे. त्यामुळे शासनाचा पुढे वाळू लिलाव झाला तरी लिलावधारक लिलाव न करता चोरट्या मार्गाने वाळू घेणे हाच व्यवसाय सुरू केलेला आहे. सप्टेंबरनंतर साठा संपुष्टात आला.

मेरिटाईम बोर्डाने दिलेल्या अहवालामध्ये तफावत आढळली. पोलिसांमध्ये 20 हजार रुपये राजरोसपणे घेतले जात आहेत. रात्री 12 ते पहाटे 5 या वेळेत संपूर्ण गाड्या गोव्याच्या दिशेने जाताना गाडीमागे 15 हजाराचा हप्ता आहे. यासाठी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून अन्य यंत्रणा साथ देत नसल्याचे उघड होत आहे. कोरोनाने सध्या राज्यात थैमान घातले आहे. येथील खाडीमध्ये परप्रांतीय कामगार येत असतात. त्यांच्या आरोग्य तपासणीचा प्रश्‍न निर्माण होऊन याठिकाणी कोरोनाचा फैलाव होऊ शकतो.'' 

शिष्टमंडळ भेट घेणार 

वाळू व्यवसाय व इतर जिल्ह्यातील समस्यांबाबत शिष्टमंडळ 19 ला जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन याबाबत लक्ष वेधणार आहेत. येथे झालेल्या दारू प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षकांनी काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. याकडे सुद्धा आपण लक्ष वेधणार असल्याचे श्री. उपरकर यांनी स्पष्ट केले वेळप्रसंगी वाळू व्यवसाय सत्यता जाणून घेण्यासाठी वेळप्रसंगी ड्रोनकॅमेराच्या माध्यमातून चित्रीकरण करू, असेही त्यांनी सांगितले.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT