Explosives found in Mangaon Two suspects arrested 
कोकण

माणगावमध्ये सापडली स्फोटके ; दोन संशयित अटकेत

रविंद्र पेरवे

लोणेरे (जि - रायगड) : माणगाव तालुक्यातील ढालघर स्फोटक वस्तू आढळल्यानंतर जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे. माणगाव तालुक्यातील  ढालघर येथील दत्ताराम तेटगुरे यांच्या मालकीची गावातच चाळ आहे. तिथे मोहम्मद उमर जाहीर काझी (वय 48) हा भाड्याने राहत होता. काझीकडे स्फोटक वस्तू असल्याची खबर स्थानिक पोलिसांना मिळाल्यानंतर माणगावचे पोलिस उपअधीक्षक दत्ता नलावडे, पोलिस निरीक्षक विक्रम जगताप यांनी रविवारी सायंकाळी छापा टाकला असता पन्नास हजारांचे स्फोटक वस्तू जप्त केल्या.

या कारवाईत 965 डिटेनोटर्स व 46 जिलेटीनच्या कांड्या जप्त केल्या. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांचे मार्गदर्शनानुसार व अपर पोलिस अधीक्षक सचिन गुंजाळ यांचे सूचनांप्रमाणे, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता नलावडे, पोलिस निरीक्षक विक्रम जगताप, सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड, उपनिरीक्षक प्रियांका बुरुगंले, पोलिस कर्मचारी, बॉम्बशोधक पथकाने पार पाडली.

या वस्तू आरोपींकडे कोणताही परवाना नसताना साठवल्याचे तपासात निष्पन्न झाले. तपासात पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून त्यांच्यावर माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस उपविभागीय अधिकारी दत्ता नलावडे हे करीत आहेत.

अशी मिळाली खबर

माणगाव तालुक्यातील रिळे आदिवासी वाडी येथील शेतात स्फोटक पदार्थांचा स्पर्श होऊन स्फोट झाल्याची तक्रार शुक्रवारी ता 31रोजी माणगाव पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. त्याचा तपास करता उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता नलावडे यांनी ढाळघर येथे साठा असल्याची माहिती मिळाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT