शेतकर्‍यांना याच संकेतस्थळावर माहिती भरायची आहे. 
कोकण

ऑनलाईन पंचनामे शेतकऱ्यांना अवघड; गावस्तरावर पंचनाम्याची मागणी

सुनील पाटकर

महाड : रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता शेताच्या बांधावरून सायबर कॅफे गाठावे लागणार आहे. कारण अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेले; परंतु पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांनी गुगल लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज भरण्याचे आदेश जिल्हा कार्यालयाने दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होणार असून, थेट गावातच पंचनामे करावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

ऑक्‍टोबर महिन्यात रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अजूनही सायंकाळच्या सुमारास पावसाच्या सरी येत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागचा ससेमिरा संपलेला नाही. अनेक गावांत भातपिकाचे मोठे नुकसान झालेले आहे. या नुकसानीबाबतचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित शासकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत. परंतु अनेक गावांत अद्यापही सरकारी यंत्रणा पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे आता ऑनलाईन पंचनामे होणार आहेत. 

ज्यांचे पंचनामे झाले नाहीत, अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनीच https://docs.google.com/forms/d/1W944r3a8eXfK_H8V8zEiOhl7vLDHr8I4pvqLm93BJL0/edit या गुगल लिंकवर नुकसानीचा अर्ज भरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. सध्या अनेक गावांत इंटरनेट सुविधा नाही. सर्वच शेतकऱ्यांकडे मोबाईल सुविधा नाही. काहींना असे अर्ज भरता येणे शक्‍य होणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना शहरात सायबर कॅफेत येऊन असे अर्ज भरावे लागणार आहेत. यात शेतकऱ्यांचा वेळ व खर्च वाया जाणार आहे. गावातील ऑनलाईन शिक्षणासारखी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. यामुळे शेतकरी नुकसानीपासून वंचित राहू शकतो. यासाठी गावस्तरावर पंचनामे व्हावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

शेतीची कामे अजून संपलेली नाहीत. सरकारने ऑनलाईन अर्ज भरून घेण्यापेक्षा ग्रामपंचायत पातळीवर थेट पंचनामे केल्यास शेतकऱ्यांना सोयीचे होईल. 
- टी. एस. देशमुख, अध्यक्ष, किसान क्रांती संघटना 

(संपादन : उमा शिंदे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT