कोकण

देवगड हापूसची ओळख वाचवण्यासाठी शेतकरी न्यायालयात जाणार

अनंत पाताडे

सावंतवाडी - देवगड हापुसचा देशात नावलौकिक आहे. त्यामुळे या आंब्याला दरवर्षी मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र आता देवगड हापूसची ओळखच धोक्यात आली आहे. याचे कारण आहे कोकणातील आंब्याला मिळालेले हापूसचे भौगोलिक नामांकन. दरम्यान देवगड हापूसची ओळख वाचवण्यासाठी येथील शेतकरी आता न्यायालयात धाव घेणार आहेत. 

नुकतेच कोकणातील आंब्याला हापूस असे भौगोलिक नामांकन मिळाले आहे. त्यामुळे संपूर्ण कोकणातल्या आंब्याला आता हापूस म्हणून ओळखले जाणार आहे. सध्या रत्नागिरीचा आंबा रत्नागिरी हापूस म्हणून तर सिंधुदुर्गचा देवगड हापूस नावाने ओळखला जातोय. तसेच या दोन्ही आंब्याना त्यांच्या नावाने चांगली बाजारपेठ देखील उपलब्ध आहे. मात्र नव्याने मिळालेल्या भौगोलिक नामांकनामुळे देवगड हापूसची ओळखच धोक्यात आली आहे. त्यामुळे देवगडचे शेतकरी न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत आहेत. 

देवगड हापूस नावाने प्रचलित असलेल्या सिंधुदुर्गातील आंब्याला मोठी मागणी आहे. जिल्ह्यात दरवर्षी अंदाजे १ लाख मेट्रिक टन एवढे आंब्याचे उत्पादन निघते. एकट्या देवगडमधून ५० हजार मेट्रिक टन आंबा उत्पादित होतो. यातील ९८ टक्के आंब्याला भारतीय बाजारपेठेत मागणी आहे. तर अवघा दोन टक्के आंबा परदेशात निर्यात होतो. त्यामुळे आगामी काळात सिंधुदुर्गतील आंबा फक्त हापूस नावाने ओळखला गेल्यास देवगड हापूसची बाजारपेठ संपुष्टात येण्याची शक्यता आहे. परिणामी देवगड हापूसच्या विक्रीत घट होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे

- अजित गोगटे, आंबा बागायतदार, शेतकरी

कोकणातील हापुसला भौगोलिक नामांकन मिळाल्याने निश्चितच अनेक फायदे होणार आहेत. मात्र याचे तोटे कोकणातीलच शेतकऱ्याच्या मुळावर उठणार नाहीत. याची देखील खबरदारी नामांकनाचे श्रेय घेणाऱ्या सरकारने घ्यावी एवढीच अपेक्षा आहे असेही गोगटे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: पुनरागमन करताच मॅक्सवेलचा गुजरातला मोठा दणका! कर्णधार शुभमन गिलला धाडलं माघारी

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : माढा येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटीलांचा भाजपा उमेदवाराला पाठिंबा

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT