Fear of elephants in Amboli area 
कोकण

आंबोली परिसरात टस्करची दहशत

अनिल चव्हाण

आंबोली (सिंधुदुर्ग) - हत्तीच्या कळपाचा संचार वाढल्याने आंबोली भीतीच्या छायेत आहे. त्यांनी शेतीचे नुकसानसत्र सुरू केले आहे. तीन हत्तींच्या या कळपाचा बंदोबस्त करण्याची मागणी वाढली आहे. 
सिंधुुदुर्गात हत्तीचा उपद्रव 2002 पासून आहे. हा उपद्रव प्रामुख्याने दोडामार्ग, सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्‍यात जास्त होता. मध्यंतरी हत्ती हटाओमुळे याची तीव्रता कमी झाली; मात्र दोडामार्ग तालुक्‍यातील तिलारी खोऱ्यात हत्तींचे वास्तव्य कायम आहे. 

आंबोलीत कोल्हापूर हद्दीतील हत्ती उपद्रव करतात. आजरा, चंदगड भागातून त्यांचा येथे संचार होतो. येथील फणसवाडी येथे हत्तींनी भात शेती आणि नाचणीच्या शेतीचे नुकसान केले आहे. गेल्या काही दिवसांपासून नांगरतास भागात 3 हत्तींचा कळप दिसून येत आहे. त्यातील एक मोठा टस्कर तर आंबोली तसेच आजरा हद्दीवर घाटकरवाडी आणि फणसवाडी धरण भागात बऱ्याचदा दिसून येतो. हत्तींना हटवावे तसेच नुकसानीची पाहणी करावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून होत आहे.

गेल्यावर्षी आंबोलीत पाच हत्ती दाखल झाले होते. यावर्षीही पुन्हा शेतीचे नुकसान सुरू झाल्याने स्थानिकांत भीती आहे. हत्तींचा बंदोबस्त करावा व नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी, अशी मागणी शेतकरी रूपा गावडे, बाळकृष्ण गावडे, संजय गावडे, गजानन गावडे आदींनी केली आहे. यानंतर वनविभागाचे वनपाल व्ही. डी. चाळके, वनरक्षक डी. बी. शिंदे, बाळा गावडे, मंगेश नाटलेकर, नामदेव गावडे यांनी पंचनामा केला. 

आंबोलीत नांगरतास वसंतराव शुगर इन्स्टिट्यूटकडे चार दिवसांपूर्वी एक हत्ती दिसला होता. तेथून नुकसानीची तक्रार आली होती. आज फणसवाडी येथील पंचनामा करून भरपाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल. गस्तीसाठी वन अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाठवले आहे. 
- दिगंबर जाधव, वनक्षेत्रपाल, आंबोली 

पाठलागाच्या घटना 
फणसवाडी येथे रात्री नाचणीचा मळा राखायला गेलेल्या प्रथमेश गावडे आणि रूपा (दादू) गावडे यांचा पाठलाग टस्कराने केला. ते धावत एक मांगरात लपल्यावर हत्तीने रात्रभर घिरट्या घातल्या. हत्तीने आपली दहशत दाखवली. 

गेळे भागातही दिसला 
काल (ता.29) गेळेत असणारा हत्ती स्थानिक भागात फिरत आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाकडून गस्त सुरू आहे, असे वनविभागाचे वनसेवक बाळा गावडे यांनी सांगितले. 

नाचणीकडे मोर्चा 
नांगरतास येथे ऊस शेतीच्या नुकसानीनंतर आता फणसवाडी येथील नाचणीकडे हत्तींनी मोर्चा वळवला. आंबोलीत 7 दिवसांपासून एक टस्कर दिसत असून नांगरतास येथे प्रकाश गावडे यांची नाचणी शेती, कृष्णा पडते यांच्या ऊस शेतीचे नुकसान केले आहे.  

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT