Female doctor Corona becomes suspicious patient in ratnagiri kokan marthi news
Female doctor Corona becomes suspicious patient in ratnagiri kokan marthi news 
कोकण

COVID-19 धक्कादायक : कोरोना संशयित डॉक्टरांचेच नमुने पाठवण्यास शल्य चिकित्सकांची टाळाटाळ...

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोरोनासंदर्भात आणखी एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. कोरोना पाँझिटीव्ह रुग्णावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करणार्‍या महिला डॉक्टर कोरोना संशयित रुग्ण बनली आहे. तशी लक्षणे दिसू लागल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. या महिला वैद्यकीय अधिकार्‍याने आपल्यावर उपचार व्हावे, म्हणून घशातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी दिले होते. मात्र जिल्हाशल्य चिकित्सकांनी ते पुढे पाठविले नसल्याची तक्रार त्या महिला डॉक्टरांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

अंतर्गत टोकाचे मतभेत
संपूर्ण जग आणि देश या विषाणाचा धीटपणाने आणि एकोप्याने सामना करीत आहे. मात्र वैयक्तिक वादातून या महिला डॉक्टरचे नमुने पुढे पाठविण्यात आले नसल्याची दुर्दैवी घटना जिल्हा रुग्णालयात घडली आहे. यावरून वैद्यकीय अधिकार्‍यांमधील अंतर्गत टोकाचे मतभेत चव्हाट्यावर आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात दुबईहून आलेली एक व्यक्ती कोरोना पाँझिटीव्ह आढळून आली आहे. त्यामुळे जिल्ह्याची सर्व यंत्रणा कामाला लागली असून शृंगारतळी येथे संचारबंदी तर जिल्ह्यात जमावबंदी लागू आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व व्यवहार ठप्प आहेत.बाजारपेठ बंद आहेत.

मात्र जिल्हा रुग्णालयात वेगळच

14 संशयित रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोनाचा प्रसार थांबण्यासाठी एकीकडे सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. मात्र जिल्हा रुग्णालयात वेगळी आणि धक्कादायक बाब पुढे आली आहे. कोरोना पॉझिटव्ह रुग्णावर उपचार करणार्‍या महिला डॉक्टरमध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने खळबळ उडाली आहे. या उलट म्हणजे महिला वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कोणतेही उपचार करण्यात आले नाहीत. चाचणी साठी नमुने देण्यात आले तरी ते जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पुढे पाठविले नसल्याची तक्रार थेट संबंधित महिला डॉक्टरने जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याकडे काल रात्री केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणात आज सर्वात मोठी घडामोड! बाप-लेकाला कोर्टात हजर करणार, नव्याने गुन्हा दाखल

Pune Porsche Accident: अल्पवयीन आहे म्हणून काय झालं? उत्तराखंडमधील एकाला जामीन नाकारला, पुण्यात वेगळा न्याय कशामुळे

RR vs RCB : सामना न खेळता RCB आयपीएलमधून जाणार बाहेर? BCCIच्या 'या' नियमामुळे चाहते टेन्शनमध्ये

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; मिडकॅप निर्देशांक उच्चांकावर, कोणते शेअर्स वधारले?

Loksabha Election : अमित शहांच्या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक;‘आप’ला मतदान करणारे पाकिस्तानी असल्याचा केला होता दावा

SCROLL FOR NEXT