festival of navratri the temple of sojal goddess locked for people in sadavali ratnagiri 
कोकण

नवरात्रोत्सवात देवरुख सोळजाई मंदिर भाविकांसाठी राहणार बंद

प्रमोद हर्डीकर

साडवली : देवरुखची ग्रामदेवता श्री देवी सोळजाई मंदिर देवस्थानचा नवरात्रोत्सव यंदा कोरोनामूळे सूनासुना होणार आहे. नवरात्रोत्सवाची साडेतीनशे वर्षाची परंपरा यंदा प्रथमच खंडित होणार आहे. नवरात्रोत्सव काळात मंदिर बंद राहणार असल्यामुळे अनेकांना केवळ कळसाचे दर्शन घेऊन समाधान मानावे लागणार आहे. 

देवी सोळजाई देवीचा नवरात्रोत्सव 17 घटस्थापनेपासून शनिवार 24 रोजीपर्यंत होणार आहे. यावेळी फक्त प्रहर नियोजन करण्यात आले आहे. देवरूख शहरातील वाडीवाडीतील ठराविक 4 ते 5 लोक प्रहरासाठी मंदिरात उपस्थित राहणार आहेत, यासंबधी नियोजन करण्यात आले आहे. भाविकांसाठी मंदिर बंद राहणार आहे. त्यामुळे विशेष करून महिला वर्गासाठी देवीची ओटी भरणे यंदा शक्य होणार नाही. 

नवरात्रोत्सवात सोळजाई ग्रामदेवता मंदिर गजबजलेले असते. भाविकांची गर्दी आणि होणारे कार्यक्रम यांची रेलचेल असते. यंदा मात्र कोरोनामूळे कुघेच कार्यक्रम होणार नसल्याने भजनी, जाखडी व नमन कलाकारांसह सांस्कृतिक कार्यक्रमातील कलाकार यांना कला सादर करता येणार नाही. त्यामुळे ते सर्व कलाकारांतून नाराजीचा सुर उमटत आहे. शासन निर्णयाप्रमाणे देवस्थान योग्य ते नियोजन करत आहे. त्यामुळे नागरिकांनी देवस्थानला  सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष बापू गांधी यांनी केले आहे. परिणामी यंदा नवरात्रीचे नउ रंग कोरोनामुळे फिके पडणार आहेत. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI ची मोठी घोषणा! WPL 2027 च्या तारखा जाहीर; २८ ऑक्टोबरला ऑक्शन, फ्रँचायझीला या महिन्याची दिलीय डेडलाईन, नेमकं काय?

Road Development : धनंजय मुंडेंच्या मागणीला यश! लोखंडी सावरगाव-बर्दापूर फाटा रस्ता होणार चौपदरी; १०४.४९ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध

Saudi Arabia Drone Attack : मुस्लिमांसाठी पवित्र मक्कावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न ; सौदीने हवेतच केले नष्ट, भारताने व्यक्त केली चिंता

Gangapur News : शिक्षकांची बंद केलेली वेतनवाढ आदेश त्वरित रद्द करावा; आमदार सतीश चव्हाण यांची मागणी

Nagpur News : सहकाराचा गाडा रुळावरून घसरला! दहा वर्षांत आठ सहकारी पतसंस्था डबघाईस, २२ संस्था अवसायनात; मौद्यात सहकार संकटात

SCROLL FOR NEXT