festival of shigmo start in konkan precaution of corona 
कोकण

...हुरा रे हुरा, आमच्या भैरीबुवाचा सोन्याचा तुरो ...रे होलिओ; कोकणात शिमगोत्सवाची सुरुवात

राजेश शेळके

रत्नागिरी : ...हुरा रे हुरा आणि आमच्या भैरीबुवाचा सोन्याचा तुरो ऽऽ...रे होलिओ...ऽऽ, आलकी रे आलकी, आमच्या भैरीबुवाची सोन्याची पालखी, होलिओ... अशा फाकांनी फाल्गुन पंचमीला म्हणजेच पहिल्या होळीला सुरवात झाली. मात्र कोरोनाच्या सावटामुळे यंदाच्या शिमगोत्सवावर मर्यादा आल्या आहेत. देवतांच्या पालख्या, घरोघरी नेणे, नाचवणे आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तरी कोकणातल्या या सर्वांत मोठ्या उत्सवाचा उत्साह मात्र कायम आहे.

शिमगोत्सव आणि कोकण यांचे अतूट नाते आहे. कोकणात ज्याप्रमाणे गणेशोत्सवाची धूम असते, तसाच उत्साह शिमगोत्सवातही थाटात आणि भक्तीभावात साजरा केला जातो. मुंबईत नोकरी-व्यवसायानिमित्त गेलेले सर्व चाकरमानी शिमगोत्सवाला आवर्जून परततात. संपूर्ण कोकणात हा उत्सव एकाचवेळी साजरा होत असला तरी प्रत्येक गावाची प्रथा-परंपरा वेगळी आहे.

शिमगोत्सवात पहिले 9 दिवस हे वाडीतील होळीचे असतात. त्यानंतर दहाव्या दिवशी गावचा सार्वजनिक होम होतो. वाडीतील बालगोपाळ मंडळी संध्याकाळी एकत्र येऊन वाजतगाजत होळीखुंटावर होळी आणतात. रात्री आट्या-पाट्या, कबड्डी असे खेळ होतात. त्यानंतर होळी पेटविण्यासाठी लागणारे गवत, कवळ, लाकडे, असे साहित्य जमा केले जाते. देवाच्या नावाने हाळ्या देत होळीभोवती फेर मारून होळी पेटविली जाते. यावेळी वाडीतील लहानथोर मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.

दहाव्या दिवशी आंब्याचे झाड तोडणे, ते नाचवत होळीच्या ठिकाणी नेऊन होम पेटवला जातो. त्याआधी ग्रामदेवतेला रूपं लावली जातात. शिमगोत्सव म्हणजे मानपानाचा सण असतो. ग्रामदेवतेची पालखी सजविल्यानंतर ती मुख्य होळीसाठी सहाणेवर आणली जाते. मुख्य होमाच्या दिवशी होळीभोवती पालखी नाचविली जाते. काही गावांतून पौर्णिमेला म्हणजे दहाव्या दिवशी मुख्य होम असतो तर काही गावांचा होम हा पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी असतो. यालाच भद्रेचा शिमगा’ असे म्हणतात. तिसर्‍या दिवशी ज्या गावातून मुख्य होम असतो, त्याला तेरसा शिमगा असे म्हटले जाते. होळीनंतर पालखी एक दिवस सहाणेवर विराजमान होते. त्यानंतर ती ठरल्याप्रमाणे मानकरी व वाडीतील इतर घरांमध्ये दर्शनासाठी जाते.
 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासांत सहा फूट सहा इंचांनी वाढली

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT